Khel Ratna Award 2021: नीरज चोप्रा, रवी दहिया, मिताली राज, पी. श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची 'खेलरत्न'साठी शिफारस
By ऑनलाइन लोकमत | Published: October 27, 2021 05:52 PM2021-10-27T17:52:46+5:302021-10-27T18:00:09+5:30
Khel Ratna Award 2021: खेलरत्न आणि अर्जुन पुरस्कारांची घोषणा, जाणून घ्या संपूर्ण यादी
Khel Ratna Award 2021: भारताचा 'गोल्डन बॉय' म्हणजेच ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता भालेफेकपटू नीरज चोप्रा, रौप्य पदक विजेता कुस्तीपटू रवी दहिया, महिला क्रिकेटपटू मिताली राज, हॉकीपटू पी.श्रीजेश यांच्यासह एकूण ११ जणांची क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजल्या जाणाऱ्या 'खेलरत्न' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार समितीची बुधवारी बैठक झाली. यात एकूण ११ जणांची मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली. तर एकूण ३५ जणांची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
भारतासाठी यंदाचं वर्ष क्रीडा क्षेत्रासाठी खूप महत्त्वाचं ठरलं. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी नोंद केली. तर टोकियो पॅरालिम्पिकमध्येही भारतीय खेळाडूंचं वर्चस्व राहिलं. अवनी लेखरा पॅरालिम्पिकमध्ये दोन सुवर्णपदकं कमावणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली. तर सुमील अंतील यानं पॅरा भालाफेकीत सुवर्णपदकाची कमाई केली. या दोघांचीही खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे.
'खेलरत्न' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आलेले खेळाडू-
नीरज चोप्रा (अॅथलेटिक्स)
रवी दहिया (कुस्ती)
पी.आर.श्रीजेश (हॉकी)
लोव्हलिना बोरगोहाई (बॉक्सिंग)
सुनील छेत्री (फुटबॉल)
मिताली राज (क्रिकेट)
प्रमोद भगत (बॅडमिंटन)
सुमीत अंतिल (भालाफेक)
अवनी लेखरा (नेमबाजी)
कृष्णा नागर (बॅडमिंटन)
एम नरवाल (नेमबाजी)