सर्वश्रेष्ठ खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत नेमारचाही समावेश
By admin | Published: July 12, 2014 11:07 PM2014-07-12T23:07:54+5:302014-07-12T23:07:54+5:30
ब्राझीलचा दुखापतग्रस्त स्टार खेळाडू नेमारचा विश्वचषक स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या शर्यतीत समावेश आहे.
Next
रियो दि जानेरो : ब्राझीलचा दुखापतग्रस्त स्टार खेळाडू नेमारचा विश्वचषक स्पर्धेतील सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या शर्यतीत समावेश आहे. या शर्यतीत त्याला उद्या, रविवारी अंतिम सामन्यात खेळणा:या जर्मनी व अर्जेटिना संघांतील सात खेळाडूंचे आव्हान राहील.
फिफाने शुक्रवारी सर्वश्रेष्ठ खेळाडूंच्या शर्यतीत सामील असलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली. त्यात अर्जेटिनाचा लियोनेल मेस्सी, ङोव्हिअर मास्केरानो आणि एंजिल डी मारिया यांचा समावेश आहे. कर्णधार मेस्सीने या स्पर्धेत आतार्पयत चार गोल नोंदविले आहेत.
या यादीत जर्मनीतर्फे कर्णधार फिलिप लॅम, पाच गोल नोंदविणारा थॉमस म्युलर, टॉनी क्रुज आणि मॅट्स ह्युमेल्स यांचा समावेश आहे. 1क् खेळाडूंच्या या यादीत स्पर्धेत चार गोल नोंदविणा:या नेमार व्यतिरिक्त सर्वाधिक गोल नोंदविणारा कोलंबियाचा जेम्स रोड्रिगेज व नेदरलँडचा अनुभवी आर्येन रोबेन यांचा समावेश आहे. रोड्रिगेजने या स्पर्धेत सहा गोल नोंदविले आहेत. गेल्या विश्वकप स्पर्धेत सर्वश्रेष्ठ खेळाडू गोल्डन बॉल पुरस्काराचा मानकरी उरुग्वेचा डिएगो फोरलान ठरला होता. 2क्क्6 मध्ये हा मान जिनेदिन जिदानने मिळविला होता. 2क्क्2 मध्ये जर्मनीचा गोलकिपर ओलिवर कान स्पर्धेचा सवरेत्तम खेळाडू ठरला होता.
स्पर्धेतील सवरेत्तम गोलकिपर पुरस्काराच्या शर्यतीत कोस्टारिकाचा केलोर नवास, जर्मनीचा मॅन्युएल नुएर आणि उपांत्य फेरीत नेदरलँडविरुद्ध अर्जेटिनातर्फे दोन पेनल्टीचा बचाव करणारा सजिर्यो रोमेरो यांचा समावेश आहे. स्पर्धेतील सवरेत्तम युवा खेळाडू पुरस्काराच्या शर्यतीत नेदरलँडचा मेम्फिस डिपे व्यतिरिक्त पॉल पोग्वा व राफेल वराने या फ्रान्सच्या जोडीचा समावेश आहे. विजेत्यांची निवड फिफाची तांत्रिक सपोर्ट समिती करणार असून याची घोषणा रविवारी अंतिम सामन्यानंतर होणार आहे. (वृत्तसंस्था)