भारत- न्यूझीलंड मालिकेच्या धर्तीवर मोदी-जॉन की यांच्यात नवे करार

By admin | Published: October 26, 2016 07:48 PM2016-10-26T19:48:31+5:302016-10-26T19:48:31+5:30

भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिकेचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीवर भर दिला

The new agreement between Modi and John Key on the Indo-New Zealand series | भारत- न्यूझीलंड मालिकेच्या धर्तीवर मोदी-जॉन की यांच्यात नवे करार

भारत- न्यूझीलंड मालिकेच्या धर्तीवर मोदी-जॉन की यांच्यात नवे करार

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 26 -  भारत-न्यूझीलंड क्रिकेट मालिकेचा आधार घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे पंतप्रधान जॉन की यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीवर भर दिला आहे. यासंदर्भात उभय देशात काही महत्त्वपूर्ण करारांचे आदानप्रदान करण्यात आले. रांची येथे चौथा वन डे सुरू होण्याआधी उभय देशांच्या दिग्गजांमधील संवाद महत्त्वाचा ठरला  व संयुक्त पत्रकार परिषदेत मोदी यांनी आधी भाषण दिले. ते म्हणाले,‘क्रिकेटमधील काही शब्द उभय देशांमधील प्रगतीसाठी प्रेरणादायी ठरत आहेत. उभय देश ‘लाँग आॅफ’मध्ये क्षेत्ररक्षणापासून आता फलंदाजीसाठी क्रिझवर गार्ड घेण्यापर्यंत पोहोचले आहेत. बचावात्मक खेळाची जागा आक्रमक फलंदाजीने घेतली आहे.’ की देखील मागे नव्हते. ते म्हणाले,‘मोदी यांचा आभारी आहे. माझा देश मालिकेत हरला तरी मोदी यांनी पराभवाचा उल्लेख केला नाही. आमच्या देशाचा माजी कर्णधार ब्रेंडन मॅक्युलम आयपीएलमध्ये तुमच्या गुजरात लॉयन्सचा खेळाडू आहे. मोदी यांचे गृहराज्य असलेल्या गुजरातचा हा संघ आहे.’
(वृत्तसंस्था)

 

Web Title: The new agreement between Modi and John Key on the Indo-New Zealand series

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.