न्यू हायस्कूल, चाटे, लोहियाची आगेकूच

By Admin | Published: July 23, 2016 05:24 AM2016-07-23T05:24:50+5:302016-07-23T05:24:50+5:30

न्यू हायस्कूल, हणमंतराव चाटे स्कूल, स. म. लोहिया हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.

New High School, Late, Lohia's Front | न्यू हायस्कूल, चाटे, लोहियाची आगेकूच

न्यू हायस्कूल, चाटे, लोहियाची आगेकूच

googlenewsNext


कोल्हापूर : न्यू हायस्कूल, हणमंतराव चाटे स्कूल, स. म. लोहिया हायस्कूल, आदी संघांनी प्रतिस्पर्धी संघांवर मात करीत १७ वर्षांखालील सुब्रतो मुखर्जी चषक फुटबॉल स्पर्धेची पुढील फेरी गाठली.
विभागीय क्रीडासंकुल येथे शुक्रवारी सकाळच्या सत्रात न्यू हायस्कूल व राधाबाई शिंदे स्कूल यांच्यात सामना झाला. तो न्यू हायस्कूलने १-० असा जिंकला. न्यू हायस्कूलकडून ऋतुराज सूर्यवंशी याने गोल केला. हणमंतराव चाटे स्कूलने जयभारत हायस्कूलवर ३-० अशी एकतर्फी मात केली. चाटेकडून मिहीर पाटीलने दोन, तर तेजस राणेने एक गोल नोंदविला. स. म. लोहिया हायस्कूलने शांतिनिकेतनचा २-० ने पराभव केला. लोहिया हायस्कूलकडून ओंकार कट्टी, प्रथमेश पाटील यांनी प्रत्येकी एक गोल केला. महाराष्ट्र हायस्कूलने न्यू इंग्लिश स्कूलचा ४-० असा धुव्वा उडविला. ‘महाराष्ट्र’कडून अक्षय पायमलने दोन, स्वप्निल भोसले, दिग्विजय सुतार यांनी प्रत्येकी गोल नोंदविला. छत्रपती शाहू विद्यालयाने नूतन मराठी हायस्कूलचा ३-१ असा पराभव केला. ‘शाहू’कडून अजिंक्य लाली, वैष्णव निकम, प्रणव घाडगे यांनी प्रत्येकी एक गोल केला. महावीर इंग्लिश स्कूलने नागोजीराव पाटणकर हायस्कूलवर ४-३ अशी टायब्रेकरवर मात केली.
दुपारच्या सत्रात सेंट झेव्हिअर्सने न्यू मॉडेल स्कूलचा १-० असा निसटता पराभव केला. हा विजय गोल झेव्हिअर्सकडून अक्षय पवारने गोल केला. प्रायव्हेट हायस्कूलने शिवाजी मराठा हायस्कूलचा ३-१ असा धुव्वा उडविला. ‘प्रायव्हेट’कडून यश मुळीक, आशितोष शिपुगडे, अमेय बदामे यांनी, तर विवेकानंद कॉलेजने शाहू विद्यालय (सीबीएसई)चा २-० असा पराभव केला. ‘विवेकानंद’कडून अच्युत पाटोळे, के दार पोतदार यांनी प्रत्येकी एक गोल केला. स. म. लोहियाकडून हणमंतराव चाटे स्कूलचा ३-० असा धुव्वा उडविला. ‘लोहिया’कडून प्रथमेश पाटील, ओंकार कट्टी, तुषार म्हसवेकर यांनी प्रत्येकी एक गोल नोंदविला. कोल्हापूर पब्लिक स्कूलने न्यू हायस्कूलचा १-० असा निसटता पराभव केला. कोल्हापूर पब्लिक स्कूलकडून आदित्य चव्हाणने एकमेव गोल केला.

Web Title: New High School, Late, Lohia's Front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.