नव्या खेळांडूजवळ आत्मविश्वास आहे, तेवढा आमच्याकडे नव्हता - विराट कोहली
By admin | Published: March 14, 2016 06:42 PM2016-03-14T18:42:45+5:302016-03-15T00:10:41+5:30
पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १४ - पांड्या, बुमराह, नेगी यांच्याकडे खुप आत्मविश्वास आहे, इतका आत्मविश्वास जेव्हा आम्ही खेळायला सुरुवात केली तेंव्हा आमच्याकडेदेखील नव्हता असे मत भारताचा स्टार फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केले आहे. उद्यापासून टी२० विश्वचषकाच्या रणसंग्रामास सुरवात गोत आहे, त्या धरतीवर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषेदेत तो बोलत होता. टी२० मधील भारताचा उद्या सलामीचा न्यूझीलंड दरम्यान होणार आहे.
प्रत्येकजण चांगला खेळत आहे, आणि प्रत्येकाला विजयात योगदान द्यायच आहे ही संघासाठी चांगली गोष्ट आहे. गेल्या ११ टी २० सामन्यापैकी भारताने १० सामने जिंकले आहेत. भारताने सलग ७ टी२० सामने जिंकण्याचा विक्रम केला आहे. ऑस्ट्रेलिया, श्रीलंका आणि आशिया चषक स्पर्धेत लगोपाठ विजय मिळविले आहे. विजयाची हीच मालिका टी-२० विश्चषकातही कायम राखू, असा असा विश्वास भारतीय संघाचा उपकर्णधार आणि धडाकेबाज फलंदाज विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
बलाढ्या ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच देशात व्हाईट वॉश देण्याची ऐतिहासिक कामगिरी भारतीय संघाने केली आहे. त्यानंतर मायदेशात श्रीलंकेविरुद्धची टी-२० मालिका व नुकत्याच संपलेल्या आशिया चषक स्पर्धेत टीम इंडियाने सर्व क्षेत्रात खेळ उंचावत विजेतेपद पटकावले. सलग तीन मलिका विजयामुळे टीम इंडियाला आत्मविश्वास दुणावला आहे त्यामुळे या स्पर्धेत टीम इंडियाचे तगडे आव्हान असणार आहे.
यजमान असल्यामुळे टीम इंडियाकडून बऱ्याच अपेक्षा आहेत. मात्र त्याचे आपल्याला कोणतचे दडपण नसल्याचेही त्यांने सांगितले. विराटने बुमराह आणि हार्दीक पांड्याच्या कामगिरीची स्तुती केली. विश्चषकात भारताचे हे युवा खेळाडू नक्कीच आपली छाप सोडतील, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. मोहम्मद शमीच्या खेळण्याबाबत कर्णधार आणि संघ व्यवस्थापण निर्णय घेईल, असेही विराटने सांगितले.