वयाबाबत नवा विक्रम
By admin | Published: May 25, 2015 01:25 AM2015-05-25T01:25:43+5:302015-05-25T01:25:43+5:30
रोला गॅरोच्या लाल मातीवर फ्रेंच ओपन स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होताच नवा विक्रम नोंदवला गेला. यावेळी फ्रेंच ओपन स्पर्धेत ३० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या
पॅरिस : रोला गॅरोच्या लाल मातीवर फ्रेंच ओपन स्पर्धेला रविवारपासून प्रारंभ होताच नवा विक्रम नोंदवला गेला. यावेळी फ्रेंच ओपन स्पर्धेत ३० किंवा त्यापेक्षा अधिक वय असलेल्या ३९ खेळाडूंनी सहभाग नोंदवला असून हा नवा विक्रम आहे. यापूर्वीचा गेल्या वर्षी या स्पर्धेत ३० पेक्षा अधिक वय असलेल्या ३८ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. पुरुष एकेरीत रादेक स्टेपनेक सर्वांत प्रौढ खेळाडू आहे. स्पर्धेला प्रारंभ झाला त्यावेळी त्याचे वय ३६ वर्ष १९२ दिवसांचे आहे. या गटात समावेश असलेला व दुसरे मानांकन प्राप्त रॉजर फेडररचे वय ३३ वर्षांचे आहे. पुरुष एकेरीत पहिल्याच फेरीत गारद झालेला युज्नी ३२ वर्षांचा आहे. युज्नीने बोस्नियाच्या दामिर दजुमहरविरुद्धच्या लढतीत पहिले दोन सेट गमाविल्यानंतर माघार घेतली. ३२ वर्षीय फिलिप कोलश्रायबरने ३० वर्षीय जपानी खेळाडू गो सोयदाविरुद्ध विजय मिळविण्याची कामगिरी केली.