स्मिथला रोखण्यासाठी विराटच्या भात्यात नवे अस्त्र
By admin | Published: March 22, 2017 08:07 PM2017-03-22T20:07:39+5:302017-03-22T20:09:56+5:30
हवामान विभागाने धर्मशाळा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मैदानावर गवत असल्यामुळे चेंडूला आऊट स्विंग मिळू शकतो
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 22 - भारत आणि ऑस्ट्रेलियातील चौथा आणि अखेरचा सामना धर्मशाळा येथे खेळवला जाणार आहे. पहिल्या तिन्ही कसोटीत भारतीय गोलंदाजावर वर्चस्व गाजवणाऱ्या ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथला रोखण्यासाठी भारतीय संघात मोहमद्द शमीची निवड केली जाण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने धर्मशाळा येथे हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे. मैदानावर गवत असल्यामुळे चेंडूला आऊट स्विंग मिळू शकतो. चेंडू स्विंग करण्यात मोहमद्द शमी पारागंत आहे. त्यामुळे भारतीय गोलंदाजीला आधिक धार येऊ शकते. मोहमद्द शमीची संघात वर्णी लागल्यास करुण नायरला संघाबाहेर बसावे लागेल.
गेल्या मालिकेवेळी मोहमद्द शमीला दुखपत झाल्यामुळे तो संघाबाहेर होता, सध्या तो दुखापतीतून सावरला असून नुकत्याच झालेल्या विजय हजारे चषकात चांगली गोलंदाजी केली आहे. दरम्यान, मोहम्मद शमी धर्मशाळा येथे दाखलही झाला आहे.
क्रीडा समीक्षकांच्या मते धर्मशाळाच्या खेळपट्टीवर थोडे गवत आहे त्यामुळे खेळपट्टी वेगवान गोलंदाजांसाठी अनुकूल ठरू शकते. चौथ्या कसोटीत विराट पाच गोलंदाजासह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. तीन वेगवान आणि दोन फिरकी गोलंदाजासह ऑस्ट्रेलियाला आडचणीत आणून चौथा आणि शेवटाचा सामना जिंकून मालिका 2-1ने खिशात घालण्याचा निर्धार विराटसेनेने केला आहे.