न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियालावर ८ धावांनी विजय
By admin | Published: March 18, 2016 06:25 PM2016-03-18T18:25:27+5:302016-03-18T18:25:27+5:30
शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियालाचा ८ धावांनी पराभव करत टी २० विश्वचषकात दुसऱ्या विजयाची नोंद केली.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १८ - शेवटच्या चेंडूपर्यंत चाललेल्या अटीतटीच्या सामन्यात न्यूझीलंड संघाने पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या ऑस्ट्रेलियालाचा ८ धावांनी पराभव करत टी २० विश्वचषकात दुसऱ्या विजयाची नोंद केली. न्यूझीलंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना गुप्टील(३९),ग्रांट इलियट(२७), कर्णधार केन विलियम्सन (२४) आणि कोलिन मुन्रो (२३) यांच्या दमदार खेळीच्या बळावर निर्धारित २० षटकात ८ गड्याच्या मोबदल्याच १४२ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने चपळ क्षेत्ररक्षणाच्या जोरावर त्यांनी २ न्युझीलंडचे फलंदाज धावबाद केले. फॉक्नर आणि ग्लेन मॅक्सवेल यांनी प्रत्येकी २ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
न्यूझीलंडने दिलेल्या १४३ धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाने उस्मान ख्वाजा (३८), मिशेल मार्श(२४), ग्लेन मॅक्सवेल(२२) यांच्या खेळीच्या बळावर निर्धारित २० षटकापर्यंत ९ गड्यांच्या मोबदल्यात १३४ धावांपर्यंत मजल मारता आली. कर्णधार स्मिथ, डेविड वॉर्नर, वॅटसन, फॉक्नर यांना आपली साजेशी खेळी करता आली नाही. न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मिशेल मॅक्लाघनने ३ फलंदाजांची शिकार केली तर मिशेल सॅन्टनर आणि कोरी अॅण्डरसनने प्रत्येकी २ फलंदांना बाद केले.