न्युझीलंडचे इंग्लडपुढे १५४ धावांचे आव्हान

By admin | Published: March 30, 2016 08:34 PM2016-03-30T20:34:48+5:302016-03-30T20:34:48+5:30

शेवटच्या हाणामारीच्या षटकात इंग्लडच्या गोंलदाजांनी केलेल्या भेदक गोंलदाजीच्या जोरावर इंग्लडने न्युझीलंडला निर्धारीत २० षटकात १५३ धावांपर्यंतच रोखले.

New Zealand beat England by 154 runs | न्युझीलंडचे इंग्लडपुढे १५४ धावांचे आव्हान

न्युझीलंडचे इंग्लडपुढे १५४ धावांचे आव्हान

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ३० - शेवटच्या हाणामारीच्या षटकात इंग्लडच्या गोंलदाजांनी केलेल्या भेदक गोंलदाजीच्या जोरावर इंग्लडने न्युझीलंडला निर्धारीत २० षटकात १५३ धावांपर्यंतच रोखले. चांगल्या सुरवातीनंतर न्युझींडची मधली फळी ढासळल्यामुळे न्युझीलंड मोठ्या धावसंखेपासून वंचीत राहिला. टी२० विश्वचषक स्पर्धेतील पहिला उपांत्य सामना इंग्लंड वि. न्यूझीलंड संघात दिल्लीतील फिरोजशाह कोटला मैदानावर खेळला जात आहे. या महत्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यझीलंडने प्रथम फलंदाजी करत निर्धारीच २० षटकात १५३ धावा केल्या आहेत. विजयासाठी इंग्लडला निर्धारीत २० षटकात १५४ धावांची गरज आहे. न्युझीलंडकडून कर्णधार विलियमसन ३२ धावा काढून बाद झाला त्याला मोइन अलीने आपल्याच गोंलदाजीवर बाद केले. तर १२ चेंडूंत १५ धावा करणारा गपटील विलीच्या गोलंदाजीवर बटलरकडे झेल देत बाद झाला. मुनरोने ३२ चेंडूत एक षटकार आणि ७ चौकाराच्या मदतीने ४६ धावा केल्या. रॉस टेलरला आपल्या लौकीकास साजेशी खेळी करण्यात अपयश आले तो ६ धावांवर बाद झाला. ल्युक राँचीने २ धावा केल्या. अंडरसन २८ धावार बाद होणारा न्युझीलंडचा सहावा फलंदाज ठरला. कर्णधार विलियमसन आणि मुनरो यांच्यात दुसऱ्या गड्यासाठी ७४ धावांची भागीदारी झाली. ही न्युझीलंडकडून सर्वात मोठी भागीदारी होय.
बेन स्टोक्सने ४ षटकात ३ फलंदाजांना बाद केले. तर डेविड विले, क्रिस जॉर्डन, लेयाम प्लंकेट आणि मोइन अली यांनी प्रत्येकी एका फंलदाजाला बाद केले.
या विश्वचषकात न्यूझीलंडने एकही सामना हरलेला नाही. उपांत्य फेरीच्या या सामन्यासाठी इंग्लंडच्या संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. दुसरीकडे न्यूझीलंडच्या संघात हेनरी निकहोल्सच्या जागी मार्टिन गुप्टिल आणि एडम मिल्नेच्या जागी नाथन मॅक्कुलमला संधी देण्यात आली आहे.
 
प्रतिस्पर्धी संघ - 
न्यूझीलंड : केन विलियमसन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, ग्रांट इलियट, मिशेल मॅक्लिंघन, कोरी एंडरसन, नेथन मॅक्कुलम, कोलिन मुनरो, लूक रौंची, मिशेल सैंटनर, इश सोढ़ी.
इंग्लंड : इयान मोर्गन (कर्णधार), एलेक्स हेल्स, जेसन रॉय, जोए रूट, मोइन अली, जोस बटलर, बेन स्टोक्स, क्रिस जॉर्डन, डेविड विले, लेयाम प्लंकेट, आदिल राशिद.

Web Title: New Zealand beat England by 154 runs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.