न्यूझीलंडने केला शेवट ‘गोड’

By admin | Published: December 29, 2014 11:52 PM2014-12-29T23:52:07+5:302014-12-29T23:52:07+5:30

न्यूझीलंडने सोमवारी श्रीलंकेला पहिल्या कसोटीत चौथ्याच दिवशी आठ गडी राखून पराभव करीत वर्षाचा शेवट गोड केला.

New Zealand beat the final 'sweet' | न्यूझीलंडने केला शेवट ‘गोड’

न्यूझीलंडने केला शेवट ‘गोड’

Next

ख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने सोमवारी श्रीलंकेला पहिल्या कसोटीत चौथ्याच दिवशी आठ गडी राखून पराभव करीत वर्षाचा शेवट गोड केला. न्यूझीलंडने वर्षभरात पहिल्यांदा पाच कसोटी विजय मिळविले आहेत.
दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात न्यूझीलंडला विजयासाठी १०५ धावांचे लक्ष्य मिळाले होते. ते त्यांनी दोन गड्यांच्या मोबदल्यात गाठले. रॉस टेलर ३९ आणि केन विलियम्सन ३१ यांनी नाबाद खेळी केली. संघाने मायदेशात भारतावर १-० ने विजय मिळविल्यानंतर विंडीजला त्यांच्याच भूमीत २-१ ने धूळ चारली. त्यानंतर दुबईत झालेली पाकविरुद्धची मालिका १-१ ने बरोबरीत सोडविली. लंकेला त्यांनी आज १-० ने नमविले.
न्यूझीलंडने पहिल्या डावात ४४१ धावा केल्या, तर लंकेला १३८ धावांत लोळविले होते. ३०३ धावांनी माघारलेल्या लंकेला फॉलोआॅनमध्ये खेळावे लागल्यानंतर दिमूथ कौणारत्नेच्या १५२ धावांमुळे ४०७ धावा उभारल्या. लंकेने दिवसाचा प्रारंभ ५ बाद २९३ वरून केला. दहा धावांची भर घालून त्यांनी डावाचा पराभव टाळण्याची खातरजमा केली.
टीम साऊदी याने १९ धावांत तीन गडी बाद करताच लंकेची स्थिती ८ बाद ३२५ अशी झाली होती. आॅफ स्पिनर मार्क क्रेगने प्रसन्न जयवर्धनेला २३ बाद करीत नववा धक्का दिला. शमिंगा इरांदा ४५ व सुरंगा अकमल १६ यांनी अखेरच्या गड्यासाठी ५९ धावा करीत आघाडी शंभरपर्यंत नेली.
साऊदी आणि ट्रेंट बोल्ट यांनी न्यूझिलंडकडून प्रत्येकी चार गडी बाद केले.
लक्ष्याचा पाठलाग करणारे न्यूझिलंडचे सलामीवीर टॉम लॅथम १७ आणि हाशिम रुदरफोर्ड १० हे लवकर बाद झाल्यानंतर टेलर- विलियम्सन यांनी नाबाद सावध खेळी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले. २००८ साली न्यूझिलंडने वर्षभरात चार सामने जिंकले होते. यंदा पाच सामने जिंकून नवा विक्रम नोंदविला.(वृत्तसंस्था)

लक्ष्याचा पाठलाग करणारे न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम १७ आणि हाशिम रुदरफोर्ड १० हे लवकर बाद झाल्यानंतर टेलर- विलियम्सन यांनी नाबाद सावध खेळी करीत विजयावर शिक्कामोर्तब केले.
२००८ साली न्यूझीलंडने वर्षभरात चार सामने जिंकले होते. यंदा पाच सामने जिंकून नवा विक्रम नोंदविला.

Web Title: New Zealand beat the final 'sweet'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.