पहिल्या कसोटीसामन्यापुर्वी न्यूझीलंडला धक्का, नीशाम कानपूर कसोटीतून आऊट

By admin | Published: September 20, 2016 06:53 PM2016-09-20T18:53:27+5:302016-09-20T18:53:27+5:30

झीलंडचा अष्टपैलू जिमी नीशामला सरावादरम्यान बरगड्यांना दुखापत झाली. त्यामुळे भारताविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.

New Zealand beat New Zealand before the first Test | पहिल्या कसोटीसामन्यापुर्वी न्यूझीलंडला धक्का, नीशाम कानपूर कसोटीतून आऊट

पहिल्या कसोटीसामन्यापुर्वी न्यूझीलंडला धक्का, नीशाम कानपूर कसोटीतून आऊट

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० : न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी नीशामला सरावादरम्यान बरगड्यांना दुखापत झाली. त्यामुळे भारताविरुद्ध कानपूरमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळू शकणार नाही.

त्याआधी, वेगवान गोलंदाज टीम साऊदी टाचेच्या दुखापतीमुळे मालिकेतून आऊट झाला आहे. नीशाम ३० सप्टेंबरपासून कोलकातामध्ये खेळल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान फिट होण्याची आशा आहे. नीशामला गेल्या गुरुवारी सराव सत्रादरम्यान दुखापत झाली होती. त्याला मुंबईविरुद्ध दिल्लीमध्ये खेळल्या गेलेल्या सराव सामन्यात दोन्ही डावांमध्ये फलंदाजी करता आली नाही. त्याने केवळ पाच षटके गोलंदाजी केली.

वृत्तसंस्थेने न्यूझीलंडचे प्रशिक्षक माईक हेसन यांच्या हवाल्याने सांगितले की,ह्यनीशामला सरावादरम्यान दुखापत झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये त्याला दुखापतीचा त्रास होत आहे. दुखापतीतून सावरण्यासाठी काही दिवसांचा कालावधी अपेक्षित आहे.ह्ण

Web Title: New Zealand beat New Zealand before the first Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.