न्यूझीलंड -लंका सामना
By admin | Published: February 14, 2015 11:52 PM2015-02-14T23:52:13+5:302015-02-14T23:52:13+5:30
Next
>९८ धावांनी मात : फलंदाजांची कमाल; गोलंदाजांचीही धमालन्यूझीलंडकडून लंकेची शिकारख्राईस्टचर्च : न्यूझीलंडने विश्वचषकाच्या सलामीला शनिवारी गत उपविजेत्या लंकेची ९८ धावांनी शिकार केली. न्यूझीलंडच्या ३३२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणार्या लंकेचा डाव ४६.१ षटकांत सर्व बाद २३३ धावांत आटोपला. लंकेकडून कुणीही फलंदाज फारसा चमकला नाही. सलामीचा लाहिरू थिरिमाने याने सर्वाधिक ६५; तसेच कर्णधार अँजेलो मॅथ्यूजने ४६ धावा केल्या. न्यूझीलंडकडून कोरी ॲण्डरसन, डॅनियल व्हेोरी, टीम साऊदी, ॲडम मिल्ने आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. व्हेोरीने दहा षटकांत केवळ ३४ धावा दिल्या. त्याआधी यजमान संघाकडून ॲण्डरसनने ७५, कर्णधार ब्रँडन मॅक्युलम ६५, केन विलियम्सन ५७ आणि मार्टिन गुप्तिल ४६ धावा यांच्या धडाकेबाज खेळीच्या बळावर न्यूझीलंडने ६ बाद ३३१ धावा उभारल्या. पाठलाग करणार्या लंकेकडून थिरिमाने-दिलशान यांनी सलामीला १३ षटकांत ६७ धावा ठोकल्या. अनुभवी व्हेोरीने दिलशानचा आपल्याच चेंडूवर झेल घेत पहिला धक्का दिला. कुमार संगकाराने ३९ धावा केल्या. यादरम्यान त्याने विश्वचषकात हजार धावा पूर्ण केल्या; तसेच वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्यात दुसर्या स्थानावर झेप घेतली. व्हेोरीने अनुभवी माहेला जयवर्धनेला भोपळा न फोडू देता रोंचीकडे झेल देण्यास बाध्य केले. संगकारा पायचित झाल्याने लंकेची स्थिती ४ बाद १२९ झाली होती. मिल्नेने करुणारत्नेे १४ आणि मेंडिस ४ यांना एकाच षटकात टिपले. ३३ व्या षटकात कुलसेकरा बाद झाला. लंकेला दहा षटकांत विजयासाठी १२३ धावांची गरज होती; पण ४२ व्या षटकात साऊदीने कर्णधार मॅथ्युजला बाद करताच विजयाच्या आशा मावळल्या.त्याआधी नाणेफेक गमाविल्यानंतर फलंदाजी मिळालेल्या न्यूझीलंडकडून मॅक्युलम-गुप्तिल यांनी १५.५ षटकांत १११ धावांची सलामी दिली. या जोडीने लसिथ मलिंगाच्या चार षटकांत ४२ धावा वसूल करताच त्याला हटविण्यात आले. त्याने दहा षटकांत एकूण ८४ धावा मोजल्या. मॅक्युलम व गुप्तिल बाद झाल्यानंतर ॲण्डरसनने ४६ चेंडू टोलवित आठ चौकार, दोन षटकारांसह संघाच्या ३०० धावा पूर्ण केल्या. त्याने रोंचीसोबत (नाबाद २९) सहाव्या गड्यासाठी ७३ धावांची भागीदारी केली. लंकेकडून मेंडिस आणि लकमल यांनी प्रत्येकी दोन; तर हेराथ आणि कुलसेकरा यांनी एकेक गडी बाद केला.(वृत्तसंस्था)०००००