न्यूझीलंडचा मालिका विजय
By admin | Published: January 23, 2016 03:51 AM2016-01-23T03:51:49+5:302016-01-23T03:51:49+5:30
कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० सामन्यात पाकचा ९५ धावांनी धुव्वा उडवित मालिका २-१ ने जिंकली.
वेलिंग्टन : कोरे अँडरसनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर न्यूझीलंडने टी-२० सामन्यात पाकचा ९५ धावांनी धुव्वा उडवित मालिका २-१ ने जिंकली.
पाकिस्तानने नाणेफेक जिंकत गोलंदाजी स्वीकारली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी हा निर्णय चुकीचा ठरवित पाकिस्तानच्या गोलंदाजांचा येथेच्छ समाचार घेतला. अँडरसनने केवळ ४२ चेंडूत ६ चौकार व ४ षटकारांसह नाबाद ८२ धावा फटकावल्या. मार्टीन गप्टील (४२), कर्णधार केन विल्यमसन (३३) यांनी अँडरसनला साथ देत संघाच्या धावसंख्येला आकार दिला. यांच्या बळावर न्यूझीलंडने २० षटकांत ५ गडी गमावून १९६ धावांची भक्कम धावसंख्या उभारली. वहाब रियाझ याने २ तर आफ्रिदीने एक बळी घेतला. विजयासाठी १९७ धावांचे आव्हान पाकिस्तानला पेलवले नाही. त्यांचा डाव १६.१ षटकांत १०१ धावांत संपुष्टात आला.