द. आफ्रिकेकडून न्यूझीलंडचा धुव्वा
By admin | Published: February 18, 2017 01:13 AM2017-02-18T01:13:41+5:302017-02-18T01:13:41+5:30
अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने भेदक माऱ्याच्या बळावर २४ धावांत अर्धा संघ बाद करताच द. आफ्रिकेने एकमेव टी-२० सामन्यात
आॅकलँड : अनुभवी फिरकी गोलंदाज इम्रान ताहिरने भेदक माऱ्याच्या बळावर २४ धावांत अर्धा संघ बाद करताच द. आफ्रिकेने एकमेव टी-२० सामन्यात न्यूझीलंडचा ७८ धावांनी धुव्वा उडविला.
दौऱ्याचा शानदार प्रारंभ करणाऱ्या आफ्रिका संघाने २० षटकांत ६ बाद १८५ धावा उभारल्या. ताहिरच्या माऱ्याच्या बळावर त्यांनी न्यूझीलंडला १४.५ षटकांत १०७ धावांत गुंडाळले. ताहिरला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यात पाच गडी घेण्याची कामगिरी ताहिरने तिसऱ्यांदा केली. सामन्यानंतर तो म्हणाला, ‘हा एक वेगळा अनुभव आहे.’
आफ्रिकेकडून सलामीवीर आणि कर्णधार हाशिम आमला याने ६२, फाफ डु प्लेसिसने ३६, जेपी ड्यूमिनी २९ आणि एबी डिव्हिलियर्सने २६ धावांचे योगदान दिले.
न्यूझीलंडचे केवळ चारच फलंदाज दुहेरी आकडा गाठू शकले. त्यात टॉम ब्रूस याने सर्वाधिक ३३ धावा केल्या.(वृत्तसंस्था)