न्यूझीलंड संघाचा लंकेला ‘व्हाईटवॉश’
By admin | Published: December 22, 2015 03:00 AM2015-12-22T03:00:44+5:302015-12-22T03:00:44+5:30
केन विल्यम्सनने (नाबाद १०८) झळकावलेल्या कारकिर्दीतील १३ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला
हॅमिल्टन : केन विल्यम्सनने (नाबाद १०८) झळकावलेल्या कारकिर्दीतील १३ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने श्रीलंकेविरुद्ध सोमवारी चौथ्या दिवशी संपलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात पाच गडी राखून विजय मिळवला. या विजयासह यजमान न्यूझीलंड संघाने मालिकेत पाहुण्या श्रीलंका संघाचा २-० ने सफाया केला.
धावफलक : श्रीलंका पहिला डाव : २९२. न्यूझीलंड पहिला डाव : २३७. श्रीलंका दुसरा डाव : १३३. न्यूझीलंड दुसरा डाव : (कालच्या ५ बाद १४२ धावसंख्येवरून पुढे) :- विल्यम्सन नाबाद १०८, वॉटलिंग नाबाद १३. अवांतर (६). एकूण : ५४.३ षटकांत ५ बाद १८९. बाद क्रम : १-४, २-११, ३-७८, ४-१३०, ५-१४२. गोलंदाजी : चामीरा १७-१-६८-४, लकमल १२-४-२०-१, हेराथ ११-०-४८-०, प्रदीप १२-१-४३-०, मॅथ्यूज १-०-४-०, सिरिवर्दना १.३-०-५-०. (वृत्तसंस्था)
केन विल्यम्सन अव्वल
श्रीलंकेविरुद्धच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावणारा फलंदाज केन विल्यम्सनने इतिहास नोंदवत आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अग्रस्थान पटकावले. अशी कामगिरी करणारा तो न्यूझीलंडचा पहिला क्रिकेटपटू ठरला आहे.