न्यूझीलंडला 299 धावांवर गुंडाळले, अश्विनचे 6 बळी

By Admin | Published: October 10, 2016 11:23 AM2016-10-10T11:23:32+5:302016-10-10T19:01:38+5:30

आर. अश्विनने केलेल्या भेदक गोलदंजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला 299 धावांवर रोखत. सामन्यात 258 धावांची आघाडी घेतली आहे.

New Zealand were bowled out for 299, Ashwin 6 wickets | न्यूझीलंडला 299 धावांवर गुंडाळले, अश्विनचे 6 बळी

न्यूझीलंडला 299 धावांवर गुंडाळले, अश्विनचे 6 बळी

googlenewsNext

ऑनलाइन लोकमत

इंदौर, दि. १० - आर. अश्विनने केलेल्या भेदक गोलदंजीच्या जोरावर भारतीय संघाने न्यूझीलंडला 299 धावांवर रोखत. सामन्यात 258 धावांची आघाडी घेतली आहे. फिरकीपटू आर.अश्विनच्या फिरकीपुढे न्यूझीलंडचे फलंदाज ढेपळले. अश्विनने सहा बळी घेत भारताला सामन्यात आघाडी मिळून दिली.  जाडेजाने 2 फलंदाजांना बाद करत अश्विनला चांगली साथ दिली. तर पाहुण्यांचे 2 फलंदाज धावबाद झाले. विशेष म्हणजे, दोन्ही फलंदाज अश्विनने धावबाद केले. 

मात्र, भारतीय संघाने यजमानांना फॉलोऑन न देता दुलऱ्या जावात फलंदाजीसाठी मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. दुसऱ्या जावात भारताने बिनबाद १८ धावा केल्या आहेत. गंभीरच्या खांद्याला चेंडू लागल्यामुळे त्याने मैदान सोडले. पुजारा (१) आणि विजय (११) खेळत आहेत. गंभीरला सहा धावा असताना खांद्याला चेंडू लागल्यामुळे मैदान सोडावे लागले. 

दरम्यान, 1 बाद 118 अशा सुस्थितीत असलेला न्यूझीलंडचा डाव धावफलकावर दीडशे धावा लागण्यापूर्वीच पाच बाद 148 अशा स्थितीत होता. भारताच्या 'विराट' ५५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चांगली सुरूवात करणा-या न्युझीलंडला ११८ धावांवर पहिला झटका बसला. चांगल्या सुरुवातीनंतर न्यूझीलंडचा फिरकीपुढे डाव गडगडला होता. पण नीशॅमने सहाव्या आणि सातव्या विकेटसाठी सँटनर आणि वॅटलिंग बरोबर अर्धशतकी भागीदारी करुन न्यूझीलंडचा डाव सावरला. 

आर.अश्विनच्या गोलंदाजीवर लॅथम (५३) धावांवर बाद झाल्याने न्युझीलंडची सलामीची जोडी फुटली. लंच नंतर अश्विनने न्यूझीलंडचा लागोपाठ तीन धक्के दिले. खेळपट्टीवर स्थिरावलेला सलामीवीर गुप्टीलही (72) अश्विनच्या हाताला स्पर्शून गेलेला चेंडू स्टम्पला लागल्याने धावबाद झाला. 

 
विल्यमसनला अश्विनने (8) धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर टेलर आणि राँचीला भोपळाही फोडू न देता स्लीपमध्ये रहाणेकरवी झेलबाद केले. सध्या न्यूझीलंडच्या पाच बाद 167 धावा झाल्या असून, नीशॅम आणि वॅटलिंग ही जोडी मैदानावर आहे. 

तत्पूर्वी कर्णधार विराट कोहलीचे दुसरे द्विशतक आणि अजिंक्य रहाणेची कारकिर्दीतील सर्वश्रेष्ठ खेळी या जोरावर काल भारताने न्यूझीलंडविरुद्ध  पहिल्या डावात विशाल धावसंख्या उभारली. भारताने पहिला डाव ५ बाद ५५७ धावसंख्येवर घोषित केला. कोहलीने कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी करताना २११ धावा फटकावल्या तर रहाणेने त्याला योग्य साथ देत १८८ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात खेळताना न्यूझीलंडने दिवसअखेर बिनबाद २८ धावांची मजल मारत सावध सुरुवात केली होती.

Web Title: New Zealand were bowled out for 299, Ashwin 6 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.