न्यूझीलंडने जिंकली २-० ने मालिका
By admin | Published: February 6, 2017 01:37 AM2017-02-06T01:37:52+5:302017-02-06T01:37:52+5:30
ट्रेंट बोल्टचे ६ बळी आणि रॉस टेलरचे शतक या बळावर न्यूझीलंडने रविवारी येथे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत मालिका २-० ने
हॅमिल्टन : ट्रेंट बोल्टचे ६ बळी आणि रॉस टेलरचे शतक या बळावर न्यूझीलंडने रविवारी येथे तिसऱ्या एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात आॅस्ट्रेलियावर २४ धावांनी मात करीत मालिका २-० ने जिंकली. या विजयाबरोबरच न्यूझीलंडने पुन्हा चॅपल-हॅडली करंडकावर कब्जा मिळवला. न्यूझीलंडने पहिला सामना ६ गडी राखून जिंकला होता, तर दुसरा सामना पावसामुळे रद्द झाला होता.
केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रॉस टेलरच्या १०१ चेंडूंतील १०७ धावा आणि त्याने डीन ब्राऊनली (६३) याच्यासोबत केलेल्या शतकी भागीदारीनंतरही न्यूझीलंडला ९ बाद २८१ धावाच करता आल्या.
या लक्ष्याचा पाठलाग करताना आॅस्ट्रेलियन संघ ४७ षटकांत २५७ धावांत सर्वबाद झाला. आॅस्ट्रेलियाकडून अॅरोन फिंचने ५६, टीम हेडने ५३ व स्टोईनेसने ४२ धावांचे योगदान दिले. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने ३३ धावांत ६ गडी बाद केले.
पराभवामुळे आॅस्ट्रेलियाने जागतिक क्रमवारीतील नंबर वन
रँकिंग गमावले. आॅस्ट्रेलियाचे
११८ रँकिंग गुण झाले असून, ते
दक्षिण आफ्रिकेच्या बरोबरीत आले आहेत.
न्यूझीलंड : ५० षटकांत ९ बाद २८१. (रॉस टेलर १०७, डीन ब्राऊनली ६३, केन विलियम्सन ३७, सँटनर ३८, मिशेल स्टार्क ३/६३, फॉकनर ३/५९)
आॅस्ट्रेलिया : ४७ षटकांत सर्वबाद २५७. (अॅरोन फिंचन ५६, टीम हेड ५३, स्टोईनेस ४२. ट्रेंट बोल्ट ६/३३, सँटनर २/५२).