न्यूझीलंडने पाकला पराभूत करून मालिका जिंकली
By admin | Published: February 4, 2015 01:06 AM2015-02-04T01:06:58+5:302015-02-04T01:06:58+5:30
दुसरी एकदिवसीय लढत : केन विल्यम्सन, रॉस टेलरची शतके
Next
द सरी एकदिवसीय लढत : केन विल्यम्सन, रॉस टेलरची शतके नेपियर : केन विल्यमसन आणि रॉस टेलर यांची आक्रमक शतकी खेळी आणि नंतर टीम साउदी, एडम मिल्ने, नॅथन मॅक्युलम, ग्रॅन्ट एलियोट यांनी घेतलेल्या प्रत्येकी दोन विकेटच्या जोरावर न्यूझीलंड संघाने दुसर्या एकदिवसीय लढतीत पाकिस्तानचा ११९ धावांनी दणदणीत पराभव करून विजय नोंदवीत २-० ने मालिका जिंकली. न्यूझीलंड संघाने वेलिंग्टन येथे पहिली लढत ७ विकेटने जिंकली होती. मॅकलिन पार्कच्या मैदानावर नाणेफेक जिंकून न्यूझीलंड संघाचा कर्णधार मॅक्युलमने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याचा हा निर्णय मार्टिन गुप्तिल (७६), विल्यमसन ( ८८ चेंडूंत १४ चौकार व १ षटकाराच्या साहाय्याने ११२) आणि रॉस टेलर (७० चेंडूंत १३ चौकार व २ षटकार) यांनी सार्थक ठरविला. या तिघांच्या धुवाधार फलंदाजीमुळे न्यूझीलंडने ५० षटकांत ५ बाद ३६९ धावांपर्यंत मजल मारली. त्यांच्या ग्रॅन्ट एलिओटने २८ धावा केल्या. त्याने २१ चेंडूंत दोन षटकार ठोकले. रॉन्ची शून्यावर बाद झाला तर एनएल मॅक्युलम ९ धावांवर नाबाद राहिला. पाकिस्तानकडून मोहम्मद इरफानने ५२ धावांत दोन गडी बाद केले. त्यांच्या शाहिद आफ्रिदीने, एसान अदिल, अहमद शेहजादने प्रत्येकी एक बळी घेतला. ३७० धावांचे आव्हान घेऊन फलंदाजीस मैदानावर उतरलेल्या पाक संघाचा डाव ४३.१ षटकांत सर्वबाद २५० धावांत संपुष्टात आला. पाककडून मोहम्मद हाफिज व अहमद शेहजादने आघाडीला फलंदाजीस येऊन अनुक्रमे ८६ व ५५ धावांची खेळी करून आपल्या संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. या दोघांनी पहिल्या विकेटसाठी १११ धावांची भागीदारी केली, हाफिजने ८९ चेंडूंत ५ चौकार व ३ षटकार मारले. त्यानंतर फक्त कर्णधार मिसबाह उल हकहाच ४५ धावा करू शकला. नंतर पाकचे पाच फलंदाज दुहेरी धावसंख्या पार करू शकले नाहीत. पाकचे युनूस खान (११), शाहिद आफ्रिदी (११), उमर गुल (४), हारीस सोहेल (६), सर्फराज अहमद (१३), बिलावल भी (९), एसान अदिल (१) हे लवकर बाद झाले. (वृत्तसंस्था).===================================================