विलियम्सनच्या शतकाने न्यूझीलंड विजयी

By admin | Published: January 17, 2017 07:46 AM2017-01-17T07:46:03+5:302017-01-17T07:46:03+5:30

न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी राखून विजय मिळविला.

New Zealand won by Williamson's century | विलियम्सनच्या शतकाने न्यूझीलंड विजयी

विलियम्सनच्या शतकाने न्यूझीलंड विजयी

Next


वेलिंग्टन : कर्णधार केन विलियम्सनने कारकिर्दीतील झळकावलेल्या १५ व्या शतकाच्या जोरावर न्यूझीलंडने बांगलादेशविरुद्ध सोमवारी पाचव्या व अखेरच्या दिवशी संपलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात सात गडी राखून विजय मिळविला.
विलियम्सन व रॉस टेलर यांनी निर्धारित वेळेपूर्वी संघाला लक्ष्य गाठून दिले. त्यांनी प्रती षटक सहाच्या सरासरीने धावा फटकावताना तिसऱ्या विकेटसाठी १६३ धावांची भागीदारी केली आणि न्यूझीलंडला २१७ धावांचे लक्ष्य गाठून दिले.
न्यूझीलंडचा कर्णधार विलियम्सनने नाबाद १०४ धावांची खेळी केली, तर टेलर ६० धावा काढून बाद झाला. हेन्री निकोल्स ४ धावा काढून नाबाद राहिला.
बांगलादेशने या लढतीत सुरुवातीचे चार दिवस वर्चस्व गाजविले. बांगलादेशचा दुसरा डाव ५८ षटकांत १६० धावांत संपुष्टात आला. कर्णधार मुशफिकर रहीम वेगवान गोलंदाज टीम साऊदीच्या गोलंदाजीवर जायबंदी झाला. त्याला रुग्णालयात जावे लागले.
बांगलादेशने पहिला डाव ८ बाद ५९५ धावसंख्येवर घोषित केला होता. पहिल्या डावात सर्वाधिक धावसंख्या नोंदविल्यानंतरही पराभव स्वीकारण्याचा अनोखा विक्रम त्यांच्या नावावर नोंदविला गेला. यापूर्वीचा विक्रम १२० वर्षांपूर्वीचा होता. त्यावेळी आॅस्ट्रेलियाला इंग्लंडविरुद्ध १८८४ मध्ये सिडनी येथे ५८६ धावा फटकावल्यानंतरही पराभव स्वीकारावा लागला होता. (वृत्तसंस्था)
>मुशफिकरला रुग्णालयातून सुटी
वेलिंग्टन : बांगलादेशचा कर्णधार मुशफिकर रहीमला रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान टीम साऊदीच्या बाऊन्सरवर तो जायबंदी झाला होता. बांगलादेश संघाचा प्रवक्ता म्हणाला, ‘मुशफिकरचा रुग्णालयामध्ये एक्स-रे काढण्यात आला. त्याची दुखापत गंभीर नाही. मुशफिकर दुखापत झाल्यानंतर बराचवेळ खेळपट्टीवर होता. उभय संघातील वैद्यकीय स्टाफने त्याच्यावर उपचार केले. त्यानंतर रुग्णवाहिकेमधून त्याला रुग्णालयात नेण्यात आले.

Web Title: New Zealand won by Williamson's century

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.