भारतासमोर न्युझीलंडचे १२७ धावांचे माफक आव्हान
By admin | Published: March 15, 2016 09:02 PM2016-03-15T21:02:27+5:302016-03-15T21:09:37+5:30
भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. १५ - भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे. भारतीय गोलंदाजांनी अचूक टप्यावर मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना बांधून ठेवण्याचं काम केलं.
टी २० विश्वचषकाच्या रणसंग्रामाला आज भारत-न्युझीलंड या सामन्याने सुरवात झाली. न्युझीलंडचा कर्णधार केन विल्यमस्ने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला पण भारतीय गोलंदाजानी अचुक मारा करत न्युझीलंडच्या फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून रोखले.
भारतार्फे पहिल्याच षटकात आर अश्विनने धोकादायक मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले. तर दुसऱ्या षटकात अनुभवी नेहराने कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत भारताला दुसरे यश मिळवून दिले. आर अश्विन, नेहराने आणि रैना यांनी प्रत्येकी एका गड्याला बाद केले होते. रैनाने रॉस टेलरला धावबाद करत भारताला चौथे यश मिळवून दिले. अश्विनने आपल्या ४ षटकात ३२ धावा खर्च करताना एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले. तर रैनाने सुरेख गोलंदाजी करताना आपल्या ४ षटकात १६ धावा देताना १ गडी बाद केला. बुमराने आपल्या ४ षटकात गोलंदाजी करताना १५ धावांच्या मोबदल्यात एक गडी बाद केला.
न्युझीलंडकडून कोरी अॅन्डरसन (३४)चा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला धावा जमवणे जमले नाही. त्यांचे फलंदाज ठरावीक अंतरावर बाद होत गेले. कर्णधार केन विल्यमस् (८) कॉलीन मुन्रो (७),मार्टीन गुप्टील (६), रॉस टेलर(१०), मिशेल सेंटनेर (१८), ग्रांट इलियट(९), ल्यूक रोंची (१९), यांनी धावांचे योगदान दिले. शेवटचे वृत्त हाती आले तेंव्हा न्युझीलंडने १४ षटकात ४ गड्यांच्या मोबदल्यात ७८ धावा केल्या होत्या.
सामन्याचे हायलाइट -
- न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली असून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
- अश्विने मार्टीन गुप्टीलला पायचीत बाद करत भारताला पहिले यश मिळून दिले
- कॉलीन मुन्रोला हार्दिक पांड्याकरवी झेलबाद करत नेहराने भारताला दुसरे यश मिळवून दिले
- न्युझीलंडने १० षटकात ३ गड्यांच्या मोबदल्यात ५३ धावा केल्या. न्युझीलंडकडून कोरी अॅन्डरसन (२६) रॉस टेलर(७) नाबाद खेळत असून न्यूझीलंडचा डाव सावरण्याचा पुरेपूर प्रयत्न करत आहेत.
- रैनाचे अप्रतिम क्षेत्ररक्षण, रॉस टेलर धावचित; न्यूझीलंड ४ बाद ६१
- धोकादाक ठरु पाहणाऱ्या कोरी अॅन्डरसनला ३४ धावाववर बाद करत बुमराहने भारताला ५वे यश मिळवून दिले.
- न्यूझीलंडला सहावा धक्का. जडेजा ने केला मिशेल सॅन्टनरला आऊट
- अश्विन, नेहरा, बुमरहा, जडेजा, रैना यांनी प्रत्येकी एका न्युझीलंडच्या फलंदाजाला बाद केले
- भारतीय गोलंदाजाच्या अचूक माऱ्याच्या जोरावर भारताने न्युझीलंडला २० षटकात धावावर १२६ धावात रोखले. भारताला विजयासाठी निर्धारीत २० षटकात १२७ धावांची गरज आहे.