खेळपट्टीमुळे न्यूझीलंडचा सराव सामना रद्द

By admin | Published: October 30, 2015 10:26 PM2015-10-30T22:26:47+5:302015-10-30T22:26:47+5:30

आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडदरम्यान पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेचे आयोजन होत आहे. या मालिकेआधी आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सरावासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला शुक्रवारी खेळ सुरू

New Zealand's practice match canceled due to pitch | खेळपट्टीमुळे न्यूझीलंडचा सराव सामना रद्द

खेळपट्टीमुळे न्यूझीलंडचा सराव सामना रद्द

Next

मेलबोर्न : आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडदरम्यान पुढील महिन्यापासून कसोटी मालिकेचे आयोजन होत आहे. या मालिकेआधी आॅस्ट्रेलिया एकादशविरुद्ध सरावासाठी उतरलेल्या न्यूझीलंड संघाला शुक्रवारी खेळ सुरू होताच माघारी फिरावे लागले. ब्लॅकटाऊन ओव्हलची खेळपट्टी खराब होताच सामना रद्द करावा लागला.
सिडनी शहराच्या पश्चिमेस असलेल्या ब्लॅकटाऊन ओव्हलवर सीए एकादश आणि न्यूझीलंड संघादरम्यान सराव सामना होणार होता. पण खेळपट्टीवर मोठ्या भेगा असल्याने ही खेळपट्टी जागोजागी उखडली होती. खेळपट्टीची अवस्था बघून अखेर सामना गुंडाळावा लागला. २९ ते ३१ आॅक्टोबर दरम्यानच्या या सामन्यात शुक्रवारी दुसऱ्या दिवशी खेळ सुरू होताच गुंडाळण्यात आला. यजमान संघाने तोपर्यंत १२१.१ षटकांत तब्बल ५०३ धावा ठोकल्या व डाव घोषित केला. सलामीवीर रेयॉन कार्टर आणि अ‍ॅरोन फिंच यांनी प्रथमश्रेणी सामन्यात सलामीचा ५०३ धावांचा विक्रम नोंदविला. कार्टर २०९ आणि फिंचने नाबाद २८८ धावा ठोकल्या. या कामगिरीमुळे दोन्ही सलामीवीरांनी याआधी आॅस्ट्रेलियाकडून सलामीला केलेल्या ४५६ धावांच्या भागीदारीचा विक्रम मोडीत काढला. १९२३-२४ साली एर्नी मायने आणि बिल पोंसफोर्ड यांनी व्हिक्टोरिया स्टेटसाठी ही विक्रमी भागीदारी केली होती. सलामीचा विश्वविक्रम पाकचे वहीद मिर्झा-मन्सूर खान यांच्या नावे आहे. या दोघांनी १९७६-७७ साली प्रथमश्रेणी सामन्यात ५६१ धावांची भागीदारी केली होती. हा विक्रम आज मोडीत निघाला असता पण न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज वॉटलिंग याने कार्टरला बाद केले. लंच ब्रेकनंतर न्यूझीलंड संघ खेळण्यासाठी आला नाही. क्रिकेटसाठी ही खेळपट्टी अनफिट असल्याने सामना रद्द करण्यात आला. (वृत्तसंस्था)

Web Title: New Zealand's practice match canceled due to pitch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.