निफाड ५अंश सेल्सीअस
By admin | Published: January 22, 2016 10:41 PM2016-01-22T22:41:38+5:302016-01-22T22:55:42+5:30
निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
निफाड : तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून कडाक्याच्या थंडीचा चढउतार होत असून शुक्रवारी तापमानात पुन्हा घट होऊन कुंदेवाडी येथील केंद्रात ५ अंश सेल्सीअस इतक्या निचांकी तापमानाची नोंद झाली आहे.
तालुक्यात बुधवारी (दि.२० ) रोजी अचानकपणे तालुक्यातील तापमान ५.४, गुरूवारी तापमानात काहीसी वाढ होऊन ६ अंश सेल्सीअस, तर शक्रवारी हेच तापमान ५ अंश सेल्सीअस इतक्या निच्चाकीवर गेल्यामूळे निफाड तालुका कडाक्याच्या थंडीने गारठून गेला आहे. या थंडीमूळे सकाळी तसेच रात्री रस्त्यावरील वर्दळ मंदावली आहे. थंडीपासून बचाव करण्यासाठी नागरीक शेकोट्यांचा आधार घेत आहेत. या थंडीमूळे द्राक्ष मण्यांना तडे जात असल्याने द्राक्ष उत्पादकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. द्राक्षांच्या शरद, सीडलेस, जम्बो, परिता या द्राक्षांना जास्त धोका निर्माण होऊन द्राक्ष फुगवणीवर परीणाम होण्याची शक्यता शेतकर्यांकडून व्यक्त होत आहे. काही द्राक्ष उत्पादक बागेत शेकोट्याद्वारे धूर करून बागेत उब निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र थंडी गहू व कांदा पिकाला पोषक ठरणार आहे.