Nikhat Zareen, Boxing World Championship 2022 : अभिमानास्पद! भारताच्या निखतची ऐतिहासिक कामगिरी; वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचणारी पहिली महिला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 06:40 PM2022-05-18T18:40:59+5:302022-05-18T22:21:12+5:30
निखतने ब्राझीलच्या कॅरोलिनला ५-० ने केलं पराभूत
Nikhat Zareen, Boxing World Championship : भारताची महिला बॉक्सर निखत झरीन हिने IBAच्या महिला विश्व बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेत (IBA Women's World Boxing Championship) ५२ किलो वजनी गटात विजय मिळवला. तुर्कस्तानातील इस्तानबूलमध्ये सुरू असलेल्या या IBAWWC 2022 अजिंक्यपद स्पर्धेत तिने बुधवारी हा विजय मिळवला. निखतने सेमीफायनलच्या युद्धात ब्राझीलच्या कॅरोलिन डी अल्मेडा हिचा ५-० असा एकतर्फी पराभव केला आणि स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. निखत आता अंतिम फेरीत थायलंडच्या जुतामास जितपाँग हिच्याशी दोन हात करणार आहे.
𝙂𝙊𝙇𝘿𝙀𝙉 𝙍𝙐𝙉 ! 🤩
— Boxing Federation (@BFI_official) May 18, 2022
🇮🇳’s @nikhat_zareen becomes first 🇮🇳 boxer to cement her place in the 𝐟𝐢𝐧𝐚𝐥 of #IBAWWC2022 as she displayed her lethal form🔥 to eke out 🇧🇷’s Caroline in the semifinals! 🦾🌟
Go for the GOLD! 👊#PunchMeinHaiDum#stanbulBoxing#boxingpic.twitter.com/PDrq9x9qbh
भारताच्या निखतने दमदार खेळ करत स्पर्धेची अंतिम फेरी काढली. पण याच स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मनिषा मॉन हिचे आव्हान संपुष्टात आले. इटलीच्या इर्मा टेस्टा हिने तिला सहज पराभूत करत स्पर्धेबाहेरचा रस्ता दाखवला. पण निखतने मात्र अजिबात हार मानली नाही. तिने सेमीफायनलच्या सामन्यात ब्राझिलियन प्रतिस्पर्धीला सहज पराभूत करत थेट अंतिम फेरीत मजल मारली. त्यामुळे आता भारताचे कमीत कमी रौप्य पदक तरी निश्चित झाले आहे. परंतु, निखतची स्पर्धेतील आतापर्यंतची कामगिरी पाहता स्पर्धा जिंकून सुवर्णभरारी घेण्याचा तिचा प्रयत्न असणार आहे.