वाईट बातमी: नऊ वेळा विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या खेळाडूनं घेतला अखेरचा श्वास
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 11:29 AM2020-06-03T11:29:28+5:302020-06-03T11:48:48+5:30
क्रीडा विश्वाला मोठा धक्का...
क्रीडापटूंच्या मनाला चटका लावणारी घटना मंगळवारी घडली. मोटरसायकलिंगमध्ये नावाजलेलं नाव आणि 9 विश्वविजेतेपद नावावर असलेल्या कार्लो उब्बीआली यांचे निधन झाले. 1949मध्ये पहिली वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणाऱ्या कार्लो यांनी 125 आणि 250CC शर्यतीत वर्चस्व गाजवले होते. ते 90 वर्षांचे होते. इटालियन मीडियानं त्यांच्या निधनाचे वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
गियाकोमो अगोस्टीनी आणि व्हलेटीनो रोस्सी यांच्यानंतर इटलीच्या सर्वात यशस्वी मोटार सायकल शर्यतीतील कार्लो हे सर्वात यशस्वी नाव होतं. कार्लोनं 125 ccमध्ये सहा आणि 250ccमध्ये तीन विश्वविजेतेपद पटकावले आहे. कार्लोने 74 पैकी 39 शर्यतींमध्ये बाजी मारली.. त्यापैकी 26 विजय हे 125cc विभागातील होते. त्यांना दी फॉक्स या टोपणनावानेही ओळखले जायचे. 1960मध्ये त्यांनी निवृत्ती घेतली होती.
''कार्लोनं जेतेपद जिंकली, तेव्हा मी 10 वर्षांचा होतो आणि त्याच्यासारखं बनण्याचं मी स्वप्न पाहिलं होतं,'' असं मत 15 विश्वविजेतेपद नावावर असलेल्या अगोस्टीनीनं व्यक्त केलं.
निर्दयी मनुष्य; गर्भवती हत्तीची निर्घृण हत्या; भुकेनं व्याकुळ भटकत होती
17 वर्षीय नसीम शाह टीम इंडियाच्या विराट कोहलीला सहज बाद करेल; पाकिस्तानी क्रिकेटपटूचा दावा