IOC Session Mumbai 2023 : Nita Ambani यांच्या प्रयत्नांना यश, भारताला IOC Session 2023 चं यजमानपद! मुंबईत होणार अधिवेशन, CM Uddhav Thackeray यांनी केलं कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2022 04:03 PM2022-02-19T16:03:25+5:302022-02-19T16:13:17+5:30

नीता अंबानी, भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रयत्नांमुळे तब्बल ४० वर्षांनी भारताला मिळणार प्रतिष्ठेचं यजमानपद

Nita Ambani led India wins bid to host 2023 IOC session in Mumbai CM Uddhav Thackeray sends Special message on Twitter | IOC Session Mumbai 2023 : Nita Ambani यांच्या प्रयत्नांना यश, भारताला IOC Session 2023 चं यजमानपद! मुंबईत होणार अधिवेशन, CM Uddhav Thackeray यांनी केलं कौतुक

IOC Session Mumbai 2023 : Nita Ambani यांच्या प्रयत्नांना यश, भारताला IOC Session 2023 चं यजमानपद! मुंबईत होणार अधिवेशन, CM Uddhav Thackeray यांनी केलं कौतुक

googlenewsNext

Nita Ambani, IOC Session Mumbai 2023 : चीनच्या बिजींग शहरात सध्या आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचं १३९वं अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या सदस्या आणि IPL मधील Mumbai Indians संघाच्या मालकीण नीता अंबानी या भारताचे प्रतिनिधित्व करत आहेत. जगातील सर्वात मोठी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा (Olympic) भारतात भरवण्याच्या दृष्टीने नीता अंबानी आणि भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रयत्नांना आज मोठं यश मिळालं. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे २०२३ मधील महत्त्वाचे अधिवेशन हे मुंबईत ((IOC Session 2023 in Mumbai) भरवण्यास अधिकृत मान्यता मिळाली. या निर्णयानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नीता अंबानी यांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. विशेष म्हणजे तब्बल ४० वर्षांनी ऑलिम्पिक समितीचे हे सेशन भारतामध्ये होत आहे.

मुंबईतील या अधिवेशनाला ऑलिम्पिक समितीने अधिकृतरित्या मान्यता दिली. बीजिंगमध्ये झालेल्या ऑलिम्पिक समितीच्या परिषदेमध्ये मतदानाने हा निर्णय घेतला गेला. एकूण ८२ मतांपैकी ७५ मतं ही भारताच्या बाजूने पडली. तर १ मत भारता विरोधात होते. ६ सदस्यांनी तटस्थ राहण्याचा निर्णय घेतला. भारत २०२३ मध्‍ये मुंबईत आंतरराष्ट्रीय ऑलिंपिक समितीच्या (IOC) अधिवेशनात प्रस्ताव सादर करणार आहे. IOC सदस्या नीता अंबानींसह भारताकडून भारतीय ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष डॉ. नरिंदर बत्रा, केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर हेदेखील अधिवेशनात उपस्थित असणार आहेत.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून नीता अंबानी यांचे कौतुक

२०२३ मध्ये आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीच्या अधिवेशनाचे आयोजन करण्यासाठी मुंबईची निवड होणं ही फक्त अभिमानाची बाबच नव्हे तर भारताच्या क्रीडा क्षेत्राला नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने एक उत्तम संधी आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे यजमानपद महाराष्ट्रातील मुंबईला मिळावे यासाठी प्रयत्न केल्याबद्दल नीता अंबानी यांचे मन:पूर्वक आभार, अशा आशयाचे ट्वीट करत मुख्यमंत्री कार्यालयाच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरुन नीता अंबानी यांच्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

--

रोहित शर्मानेही ट्वीट करत केलं अभिनंदन

नीता अंबानी म्हणतात...

तब्बल ४० वर्षांनी ऑलिम्पिकची एक चळवळ पुन्हा भारतात उभी राहणार आहे. ४० वर्षांनी ऑलिम्पिक समितीचं अधिवेशन भारतात २०२३ साली होणार आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने भारतावर दाखवलेल्या विश्वासासाठी मी आभारी आहे. भारतातील मुंबईत IOC Session 2023 च्या आयोजनाची संधी मिळणं हे भारतासाठी खरंच अभिमानाची बाब असणार आहे. भारतीय ऑलिम्पिकच्या दृष्टीने ही डेव्हलपमेंट खूपच महत्त्वपूर्ण आहे. भारतीय क्रीडाक्षेत्राच्या नव्या पर्वाची ही सुरूवात आहे. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सर्वोच्च समितीचे अधिवेशन (IOC Session) २०२३ साली मुंबईत होणार असून जियो वर्ल्ड सेंटरमध्ये हे सेशन आयोजित केलं जाईल. या अतिमहत्त्वाच्या अधिवेशनात भारतीय ऑलिम्पिक समितीचे नेतृत्त्व करणं हा मोठा मान होता, अशा भावना नीता अंबानी यांनी व्यक्त केल्या. ऑलिम्पिक स्पर्धेचे यजमानपद भारताने भूषवावे हे आपल्या सर्वांचंच स्वप्न आहे, अशी इच्छाही त्यांना बोलून दाखवली.

Web Title: Nita Ambani led India wins bid to host 2023 IOC session in Mumbai CM Uddhav Thackeray sends Special message on Twitter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.