नितीन सिंग, श्रीजित सेन, लेस्टन वाझ दुसऱ्या फेरीत
By admin | Published: May 30, 2016 08:12 PM2016-05-30T20:12:05+5:302016-05-30T20:12:05+5:30
महाराष्ट्राचे श्रीजित सेन, लेस्टन वाझ व हरयाणाचा नितीन सिंग यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय अव्वल
अखिल भारतीय मानांकन टेनिस : यशराज दळवी, प्रथम भुजबळ, कुश ओरिया पराभूत
पुणे : महाराष्ट्राचे श्रीजित सेन, लेस्टन वाझ व हरयाणाचा नितीन सिंग यांनी चुरशीच्या झालेल्या लढतीत आपापल्या प्रतिस्पर्धांचा पराभव करून सोलारिस क्लब अखिल भारतीय अव्वल मालिका (सुपर सिरीज) टेनिस (१४ वर्षांखालील) स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश केला.
कोथरूड येथील क्लबच्या टेनिस कोर्टवर सुरू असलेल्या स्पर्धेत पहिल्या फेरीत तिसऱ्या मानांकित नितीन सिंगने पुण्याच्या यशराज दळवीचा ६-७(२), ६-३, ६-२ गुणांनी पराभव केला. यशराजने पहिला सेट ७-६(२) असा जिंकल्यानंतर दुसऱ्या सेटमध्ये ३-० अशी आघाडी घेतली होती; पण नंतर नितीनने जिगरबाज खेळ प्रदर्शन करून विजयश्री खेचून आणली.
आठव्या मानांकित श्रीजित सेन यालाही विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली. श्रीजितने प्रथम भुजबळचा ४-६, ६-३, ६-४ असा पराभव केला. लेस्टन वाझने कुश ओरियाचा ६-७(६), ६-४, ६-३ असा पराभव करून दुसरी फेरी गाठली.
मुलींच्या गटामध्ये अग्रमानांकित बेला ताम्हणकरने स्नेहा रानडेचा ६-२, ६-३ असा सरळ दोन सेटमध्ये पराभव करून विजयी सलामी दिली. परी सिंगने मृण्मयी भागवतला ६-०, ६-१ असे सहज नमविले. राधिका महाजनने श्रीचंद्रा तेन्तूला ६-४, ६-४ असे पराभूत केले.
निकाल : (मुख्य ड्रॉ)
मुले : पहिली फेरी : ध्रुव तांगरी (१) वि.वि. अमन दहीया ६-३, ६-४; प्रांजल तिवारी वि.वि. रोहन फुले ६-0, ६-२; आर्यन कुरेशी वि.वि. माणिक शौर्य ६-२, ६-२; गिरीश चौगुले (६) वि.वि. वीर शहा ६-0, ७-५; नितीन सिंग (३) वि.वि. यशराज दळवी ६-७(२), ६-३, ६-२; सर्वेश बिरमाने वि.वि. सुमीर श्रीवास्तव ६-३, ६-४; मयांक जोशी वि.वि. अन्मय देवराज ६-२, ६-३; श्रीजित सेन (८) वि.वि. प्रथम भुजबळ ४-६, ६-३, ६-४; निखिल थिरूमले (५) वि.वि. इंद्रजित बोरा ६-0, ६-२; विशाल पगाडला वि.वि. अर्जुन गोहाड ६-४, ७-५; अमृतजय मोहंती वि.वि. हृषीकेश पराशर ६-१, ६-३; आर्यन भाटिया (४) वि.वि. हितेश यमान्चीह्यी ६-१, ६-३; उदयवीर सिंग (७) वि.वि. अमान वासिम ६-२, ६-३;
हर्षित गुमूलुरू वि.वि. आदित शहा ६-१, ६-२;,लेस्टन वाझ वि.वि. कुश ओरिया ६-७(६), ६-४, ६-३; निशांत डाबस (२) वि.वि. सन्मय गांधी ६-१, ६-२; मुली: बेला ताम्हणकर (१) वि.वि. स्नेहा रानडे ६-२, ६-३; परी सिंग वि.वि. मृण्मयी भागवत ६-0, ६-१; राधिका महाजन वि.वि. श्रीचंद्रा तेन्तू ६-४, ६-४. (क्रीडा प्रतिनिधी)