कोणालाही कमी लेखत नाही, अर्नेस्ट अमुजुसोबतच्या सामन्यापूर्वी विजेंदर सिंहचं वक्तव्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 01:41 AM2017-12-23T01:41:59+5:302017-12-23T01:43:12+5:30
व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंह याने आपल्या करिअरमधील सर्वच लढती जिंकल्या आहेत. आता त्याची लढत घानाच्या अर्नेस्ट अमुजुसोबत होणार आहे. त्या लढतीच्या आधी त्याने सांगितले की, तो कोणालाही कमी लेखत नाही. विजेंदर येथे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल किताब वाचवण्यासाठी सुपर मिडलवेट गटात अमुजुविरोधात लढणार आहे.
जयपूर : व्यावसायिक बॉक्सर विजेंदर सिंह याने आपल्या करिअरमधील सर्वच लढती जिंकल्या आहेत. आता त्याची लढत घानाच्या अर्नेस्ट अमुजुसोबत होणार आहे. त्या लढतीच्या आधी त्याने सांगितले की, तो कोणालाही कमी लेखत नाही.
विजेंदर येथे डब्ल्यूबीओ आशिया पॅसिफिक आणि ओरिएंटल किताब वाचवण्यासाठी सुपर मिडलवेट गटात अमुजुविरोधात लढणार आहे.
सामन्याच्या पूर्वसंध्येला बोलताना त्याने सांगितले की,‘ फक्त एक दमदार पंच मारला गेला तर सामन्याचा निकाल लागू शकतो. आम्ही अनेकवेळा पाहिले आहे की, रँकिंगमध्ये खालच्या स्थानावर असलेले बॉक्सरदेखील आघाडीच्या बॉक्सरला मात देतात. मी कोणालाही कमी लेखत नाही.’
त्याने सांगितले की, ‘हा सामना एका युद्धासारखा आहे. जर त्याचे मानसिक खच्चीकरण झाले आहे, तर माझ्यासाठी ती आनंदाची बाब आहे.’
या वेळी विजेंदरने ब्रिटिश बॉक्सर आमिर खान याच्याकडून मिळत असलेल्या आव्हानाला उत्तर दिले. तो म्हणाला,‘ जर व्यावहारिक पद्धतीने हा सामना शक्य असेल तर तो झालाच पाहिजे. मी त्याचे आव्हान अनेकवेळा ऐकले आहे. मला वाटते की, आमचा सामना व्हायला पाहिजे. मी त्याच्या विरोधात लढण्यासाठी तयार आहे. मी पुढच्या वर्षात त्याच्या विरोधात खेळण्यास उत्सुक आहे. ’