...त्याची कुणाला अपेक्षा नव्हती
By admin | Published: June 15, 2017 04:03 AM2017-06-15T04:03:34+5:302017-06-15T04:03:34+5:30
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली, त्या वेळी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत होईल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. बांगलादेश
- सौरभ गांगुली लिहितात...
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेला सुरुवात झाली, त्या वेळी भारत आणि बांगलादेश संघांदरम्यान उपांत्य फेरीची लढत होईल, अशी अपेक्षा कुणी केली नव्हती. बांगलादेश संघाला ‘कच्चा लिंबू’ समजण्याचे दिवस आता गेले. ते दिग्गज संघांविरुद्ध तूल्यबळ खेळ करीत त्यांनी त्याची प्रचिती दिली आहे. दिवसागणिक त्यांच्या कामगिरीचा आलेख उंचावत आहे. २०१५च्या विश्वकप स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्रता मिळविणे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आयसीसी मानांकनामध्ये अव्वल आठमध्ये असल्यामुळे बांगलादेश संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. आता त्यांच्यासाठी त्यापुढची पायरी गाठण्याची वेळ आलेली आहे.
साखळी फेरीत बांगलादेश संघाची कामगिरी प्रत्येक लढतीगणिक सुधारली. न्यूझीलंडविरुद्धच्या लढतीत त्यांनी सर्वोत्तम खेळ केला. आता बांगलादेश संघाचा समतोल साधला गेला असून, भारताविरुद्धची महत्त्वाची लढत त्यांच्यासाठी परीक्षा ठरणार आहे. तमीम, शाकीब, मुशफिकर व कर्णधार मशरफी यांची क्षमता व अनुभव संघासाठी महत्त्वाचा आहे. मुस्ताफिजूर, तस्किन आणि रुबेल यांच्या समावेशामुळे वेगवान गोलंदाजीची बाजू बळकट झाली आहे. महमुदुल्ला, सौम्या सरकार हे फलंदाज आपली उपयुक्तता सिद्ध करण्यास सज्ज आहेत. बांगलादेश संघाचे क्षेत्ररक्षणही सुधारत आहे. मनस्थिती ही बांगलादेश संघासाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. मानसिकदृष्ट्या बांगलादेश संघ उपांत्य लढत खेळण्यास सज्ज असायला हवा. संघातील सिनिअर खेळाडूंनी ज्युनिअर खेळाडूंना दडपण न बाळगता भावनांवर नियंत्रण राखण्यासाठी मार्गदर्शन करायला हवे. आणखी एक आंतरराष्ट्रीय लढत असे समजून खेळल्यास ‘अॅड्रेलिन’वर नियंत्रण राखता येईल. अनेकदा खेळाडूंची मनोवृत्ती त्यांंच्या नैसर्गिक खेळ करण्याच्या मार्गात आडकाठी ठरत असते. बांगलादेशच्या खेळाडूंनी त्यापासून सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. ते भारताविरुद्ध खेळत असून, क्रिकेट विश्वात ही नवी प्रतिस्पर्धा उदयास आली आहे. इंग्लंडमध्ये अनेक बांगलादेशी आहेत. त्यामुळे येथे हे चाहते मायदेशातील वातावरण निर्माण करू शकतात. (गेमप्लॉन)
अशा स्थितीत दडपण व अपेक्षा वाढणार असल्यामुळे बांगलादेश संघासाठी परिस्थिती सोपी राहणार नाही. हे सर्व जरी खरे असले, तरी बांगलादेश संघाला भारताच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे, हे सत्य आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाची कामगिरी उल्लेखनीय ठरली. अश्विनच्या समावेशामुळे जडेजा एकदम वेगळाच गोलंदाज भासायला लागला. भुवनेश्वर, बुमराह व हार्दिक या त्रिकुटाच्या भेदक माऱ्यानंतर फलंदाजांनीही वर्चस्व गाजवले. चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शिखर धवनची कामगिरी विशेष बहरते. मधल्या फळीतील फलंदाजही फॉर्मात आहेत. बांगलादेश संघाला कमी लेखता येणार नाही, याची भारतीय संघाला कल्पना आहे. त्यांच्या तुलनेत आपला संघ चांगला असून प्रत्येक ाला आपल्याकडून विजेतेपदाची अपेक्षा आहे, याची भारतीय संघाला जाण आहे.
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आयसीसी क्रमवारीत अव्वल स्थानी आहे. प्रत्येक लढतीगणिक त्याच्या नेतृत्वामध्ये विशेष सुधारणा दिसून येत आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्याने संघाचे नेतृत्व योग्यपणे हाताळले. बांगलादेश संघाला कमी लेखण्याची चूक तो करणार नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या लढतीत खेळलेला संघच कायम राहील, असे संकेत मिळत आहेत.
(गेमप्लॉन)