Norway Chess: वर्ल्ड चँपियन कार्लसनने शस्त्र टाकले, विश्वनाथन आनंद दुसऱ्यांदा विजयी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2022 02:13 PM2022-06-06T14:13:02+5:302022-06-06T14:13:10+5:30
Norway Chess: विश्वनाथन आनंद यांनी नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये वर्ल्ड चँपियन मॅग्नस कार्लसनचा दुसऱ्यांदा पराभव केला आहे.
Norway Chess: भारतीय ग्रँडमास्टर आणि बुद्धीबळाचे दिग्गज खेळाडून विश्वनाथन आनंद यांनी परत एकदा वर्ल्ड चँपियन मॅग्नस कार्लसन यांचा पराभव केला आहे. आनंद यांनी नॉर्वे चेस टूर्नामेंटमध्ये क्लासिकल सेक्शनच्या 5व्या राउंडमध्ये विजय मिळवला. आता ते या स्पर्धेत पहिल्या स्थानावर पोहोचले आहेत. आनंद यांनी कार्लसनला रोमहर्षक अशा आर्मेगडन (सडन डेथ गेम) मध्ये हरवले.
50 चालींमध्ये जिंकला गेम
यापूर्वी या दोन्ही खेळाडूंमध्ये झालेला रेग्युलर मॅच 40 चालींवर ड्रॉ झाला. आर्मेगडनदरम्यान आनंद आपल्या जुन्या शैलीत खेळताना दिसले. त्यांनी अवघ्या 50 चालींमध्ये जगातील नंबर 1 खेळाड असलेल्या मॅग्नस कार्लसनला पराभवाची धुळ चारली. आता कार्लसनकडे एकूण 9.5 पॉइंट्स आहेत आणि ते या टूर्नामेंटमध्ये दुसऱ्या स्थानावर आहेत.
विश्वनाथन आनंद टॉपवर
या विजयासोबत विश्वनाथन आनंद या स्पर्धेत टॉपवर आहेत. आनंद यांच्याकडे 10 पॉइंट्स आहेत. आता या टूर्नामेंटमध्ये 4 राउंड बाकी आहेत. यात बुद्धीबळातील टॉप खेळाडूंचा आमना-सामना होईळ. आनंद यांनी यापूर्वी वँग हाओचा पराभव करुन तिसरा विजय मिळवला होता. हाओपूर्वी त्यांनी फ्रांसच्या मॅक्सिम वाचियर-लाग्रेव आणि बुल्गारियाच्या वेसलिन टोपालवला हरवले होते.