भारतात टेनिससाठी पुरेसा पैसा, एआयटीए इच्छुक नाही : कार्ती
By admin | Published: January 9, 2017 12:52 AM2017-01-09T00:52:48+5:302017-01-09T00:52:48+5:30
भारतात टेनिस खेळाडूंसाठी पैसे गोळा करणे ही समस्या नाही; मात्र अखिल भारतीय टेनिस संघाने त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी
चेन्नई : भारतात टेनिस खेळाडूंसाठी पैसे गोळा करणे ही समस्या नाही; मात्र अखिल भारतीय टेनिस संघाने त्यासाठी इच्छाशक्ती दाखवायला हवी, असे तमिळनाडू टेनिस संघाचे उपाध्यक्ष कार्ती चिदंबरम यांनी स्पष्ट केले. त्यासोबतच त्यांनी मान्य केले की, देशात फक्त क्रिकेटच व्यावसायिक रूपात खेळ आहे.
चेन्नई ओपनच्या आयोजन समितीचे अध्यक्ष कार्ती म्हणाले की, भारताकडे चांगले एकेरी खेळाडू नाही. त्यामुळे बदलाच्या काळात त्यांना आयटीएची साथ मिळत नाही. एआयटीएने २०१४ मध्ये हितसंबधांच्या वादाचे कारण देत कार्ती यांचे उपाध्यक्षपद रद्द केले होते.
कार्ती यांनी म्हटले की, ‘‘आमच्याकडे खेळाडूंसाठी पैसा नाही, असे नाही. सहा खेळाडूंसाठी दरवर्षी जास्तीत जास्त तीन कोटी रुपये लागतात. ही रक्कम फार जास्त नाही; मात्र इच्छाशक्तीचा अभाव आहे. लोक मंदिरांसाठी पैसे गोळा करतात.’’
कार्ती यांनी सांगितले की, त्यांच्याकडे योजना आहे. ती लागू केल्यास भारतीय टेनिसचे दिवस बदलतील. कार्ती यांनी सांगितले की, ‘‘युकी भांबरी, सुमित नागल, रामकुमार रामनाथन, दक्षिणेश्वर सुरेश आणि नितीन सिन्हा यांना समर्थन दिले पाहिजे. त्यांच्यासोबत प्रशिक्षक राहू शकतील. त्यांनी २६ स्पर्धांमध्ये खेळले पाहिजे. त्यातील १८ विदेशांत होतील आणि वर्षातील सहा आठवडे आरामदेखील करायला हवा. कार्ती यांच्या मते हे सर्व तीन कोटी रुपयांत होऊ शकते.’’
कार्ती पुढे म्हणाले, ‘‘एआयटीएने जर आपले वजन वापरले आणि ५० कोटी रुपयांचा विकास कोष तयार केला, तर देशात खेळाला खूप फायदा होईल.’’