भारताविरुद्ध सज्ज होण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही : मॅथ्यूज
By admin | Published: October 30, 2014 01:21 AM2014-10-30T01:21:07+5:302014-10-30T01:21:07+5:30
भारताविरुद्ध भारतात खेळणो हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामुळेच अचानकपणो ठरलेल्या या दौ:यासाठी आम्हाल पूर्णपणो वेळ मिळाला नाही,
Next
मुंबई : भारताविरुद्ध भारतात खेळणो हे नेहमीच आव्हानात्मक असते. त्यामुळेच अचानकपणो ठरलेल्या या दौ:यासाठी आम्हाल पूर्णपणो वेळ मिळाला नाही, असे वक्त्यव्य श्रीलंका संघाचा कर्णधार अँजलो मॅथ्यूज याने मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये केले.
वेस्ट इंडिजने नुकताच भारताचा दौरा अर्धवट सोडल्याने बीसीसीआयने श्रीलंका बोर्डाला एकदिवसीय मालिका खेळण्यासाठी आमंत्रित केले आणि त्यास सकारात्मक प्रतिसाद देत श्रीलंका संघ आता भारतात दाखल झाला आहे. गुरुवारी भारत ‘अ’ विरुद्ध होणा:या सराव सामन्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये मॅथ्यूजने आपले मनोगत व्यक्त केले. दरम्यान, या वेळी संघाचे प्रशिक्षक मर्वान अट्टापट्टूूची देखील उपस्थिती होती.
अचानकपणो ठरलेल्या या दौ:यामुळे आम्हाला तयारीसाठी कमी वेळ मिळाला तसेच सध्या लसिथ मलिंगा आणि रंगना हेराथ हे आमचे आघाडीचे गोलंदाज या मालिकेत खेळणार नसल्याने आमची गोलंदाजी कमजोर झाली आहे. त्यामुळे आमच्यापुढे भारताशी मुकाबला करण्याचे खडतर आव्हान आहे, असेही मॅथ्यूजने सांगितले.
या मालिकेमध्ये भारताचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी विश्रंती घेणार असल्याने त्याचा फायदा श्रीलंकेला कितपत होईल, असे विचारले असता मॅथ्यूज म्हणाला की, धोनी हा कोणत्याही संघासाठी धोकादायक खेळाडू आहे. त्याच्या अनुपस्थितीचा आम्हाला एक प्रकारे फायदाच होणार आहे. मात्र, तरीही भारताचे इतर खेळाडूदेखील त्याच तोडीचे असल्याने आम्हाला गाफील राहून चालणार नाही.
भारताविरुद्धच्या मालिकेत यशस्वी होण्यासाठी आम्हाला क्षेत्ररक्षण व गोलंदाजीमध्ये अनेक सुधारणा करावी लागणार आहे. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितीमध्ये होणारी कामगिरीदेखील निर्णायक ठरेल, असेही मॅथ्यूजने या वेळी सांगितले.
दरम्यान, या सराव सामन्याचे वैशिष्टय़ म्हणजे माहेला जयवर्धने आणि कुमार संगकारा या दिग्गज क्रिकेटपटूंचा हा दौरा अखेरचा भारत दौरा असल्याने त्यांचा खेळ जवळून पाहण्याची मुंबईकरांना शेवटची संधी असेल. (क्रीडा प्रतिनिधी)