ऐतिहासिक विजयात अडथळा नाही - सेरेना विलियम्स
By Admin | Published: August 28, 2016 05:20 AM2016-08-28T05:20:49+5:302016-08-28T05:20:49+5:30
विक्रमी २३ वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या उंबरठ्यावर असलेली नंबर वन टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विलियम्स ही यंदा अखेरची ग्रॅण्डस्लॅम असलेली अमेरिकन ओपनपूर्वी
न्यूयॉर्क : विक्रमी २३ वे ग्रॅण्डस्लॅम जिंकण्याच्या उंबरठ्यावर असलेली नंबर वन टेनिसपटू अमेरिकेची सेरेना विलियम्स ही यंदा अखेरची ग्रॅण्डस्लॅम असलेली अमेरिकन ओपनपूर्वी स्वत:ला तंदुरुस्त करण्याच्या प्रयत्नात आहे. जेतेपद मिळविण्यात मला कुठलाही अडथळा येणार नाही, असे सेरेनाचे मत आहे.
सहा वेळेची यूएस ओपन चॅम्पियन सेरेनाला यंदा या स्पर्धेत अव्वल मानांकन देण्यात आले. करिअरमध्ये पाचव्यांदा ती या स्पर्धेत अव्वल मानांकित खेळाडू राहील. गतवर्षी सेरेना अमेरिकन ओपनच्या उपांत्य सामन्यात पराभूत झाली होती. रॉबर्टा व्हिन्सीने सेरेनाला पराभवाची चव चाखवित कॅलेंडर ग्रॅण्डस्लॅमपासून रोखले. सेरेना रिओ आॅलिम्पिकच्या सुरुवातीच्या सामन्यात पराभूत होऊन बाहेर पडली.
३४ वर्षांची सेरेना त्यानंतर खांद्याच्या दुखापतीमुळे सिनसिनाटी टेनिस स्पर्धा देखील खेळू शकली नाही. पण लवकरच फिट होऊन कोर्टवर परतण्याची अपेक्षा तिने व्यक्त केली आहे. मी लवकरच फिट होऊन कोर्टवर पुनरागमन करणार आहे. गत महिन्यात विम्बल्डन टेनिस स्पर्धा जिंकून सेरेनाने स्टेफी ग्राफच्या २२ ग्रॅण्डस्लॅमच्या विक्रमाशी बरोबरी साधली होती. (वृत्तसंस्था)
साकेत मायनेनी अमेरिकन ओपनच्या एकेरी मुख्य फेरीत
भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू साकेत मायनेनीला सर्बियाच्या पेड्जा क्रिस्टीन याला ६-३ , ६-० ने पराभूत केले. ५६ मिनिटे चाललेल्या या लढतीतील विजयाने अमेरिकी ओपन एकेरी पुरूष मुख्य फेरीत प्रवेश केला आहे.
साकेतला मुख्य फेरीत पोहोचण्यासाठी पात्रता फेरीतील तीन सामने जिंकणे आवश्यक होते. त्याने एकही सेट न गमावता हे सामने जिंकले. या आधी पहिल्या सामन्यात साकेत याने स्थानिक खेळाडू मिशेल क्रेगर याला ७-६,६-४ ने पराभूत केले. पहिल्या फेरीत त्याने फ्रान्सच्या अलबानो ओलिवेट्टीला ७-५,६-३ ने पराभूत केले होते.
गेल्या वेळी युकी भांबरी आणि सोमदेव देव वर्मन यांनी ग्रॅण्डस्लॅम एकेरी स्पर्धेतील मुख्य फेरीत प्रवेश केला होता. साकेत या वर्षी आॅस्ट्रेलिया ओपनच्या पात्रतेसाठीच्या तिसऱ्या फेरीतील सामन्यात पराभूत झाला होता. तर फ्रेंच ओपनच्या पात्रतेसाठीच्या दुसऱ्या सामन्यात त्याला पराभव स्विकारावा लागला होता.
पहिल्या सेटमध्ये साकेतने आपला प्रतिस्पर्ध्याची सर्व्हिस तीन वेळा तोडली. तर दुसऱ्या सेटमध्ये २६ मिनिटात साकेतने पेड्जाची सर्व्हिस तीन वेळेस तोडली. पेड्जाने चार डबल फॉल्ट केले. तर दोनच ऐस केले. साकेतने सात एस केले.
दुखापतीत सुधारणा होत आहे, पण सरावाची पुरेशी संधी मात्र मिळणार नाही. येथे २३ वे ग्रॅण्डस्लॅम जिंकून ऐतिहासिक कामगिरी करण्यात कुठलीही कसर शिल्लक राखणार नाही, असा मला विश्वास वाटतो. अमेरिकन ओपन माझ्यासाठी नेहमीच विशेष स्पर्धा ठरली. घरच्या प्रेक्षकांपुढे आणखी एक स्पर्धा जिंकण्यासाठी मी सकारात्मक वृत्तीने खेळणार.
- सेरेना विलियम्स