हे नरसिंगचे नव्हे देशाचे नुकसान : आयओए
By Admin | Published: August 19, 2016 11:01 PM2016-08-19T23:01:16+5:302016-08-19T23:01:16+5:30
मल्ल नरसिंग यादववर लागलेली चार वर्षांची बंदी दुर्दैवी असल्याची भूमिका घेत भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हे नरसिंगचे वैयक्तिक नुकसान नसून देशाचे नुकसान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
ऑलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ : मल्ल नरसिंग यादववर लागलेली चार वर्षांची बंदी दुर्दैवी असल्याची भूमिका घेत भारतीय आॅलिम्पिक संघटनेने हे नरसिंगचे वैयक्तिक नुकसान नसून देशाचे नुकसान असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.
आयओएचे महासचिव राजीव मेहता यांनी क्रीडा लवादाचा निर्णय फारच दुर्दैवी असल्याचे संबोधले. ते म्हणाले,ह्यनरसिंग प्रकरणास अंतर्गत राजकारण कारणीभूत आहे. जे त्याला आॅलिम्पिकपासून रोखू इच्छित होते ते यशस्वी ठरले. पण या
निर्णयाविरुद्ध अपील करू. नरसिंगविरुद्धच्या बंदीचा कालावधी कमी करण्यासाठी प्रयत्न करू. या प्रकरणाच्या तळाशी जाण्यासाठी सरकारकडे सीबीआय चौकशीच्या मागणीची गरज आहे.
हे प्रकरण सोपे नाही. यामुळे भारतीय खेळांची प्रतिमा मलीन झाली आहे. मेहता पुढे म्हणाले,ह्यनरसिंगने दिल्ली हायकोर्टाची लढाई जिंकताच सोनिपतच्या साई सेंटरमधून त्याला अचानक फोन आला. नरसिंगचे सॅम्पल पॉझिटिव्ह आल्याचे सांगण्यात आले. हे कसे काय घडू शकते? खरे सांगू का, नरसिंग क्रीडा लवादात नव्हे तर आपल्याच लोकांकडून लढाईत हरला. या प्रकरणात मोठा कट शिजला आहे. चौकशी झालीच पाहिजे कारण नरसिंगच्या भविष्याचा प्रश्न आहे.