‘खोना कुछ नही, पाना सब कुछ है...’

By admin | Published: March 10, 2017 06:27 AM2017-03-10T06:27:05+5:302017-03-10T06:27:05+5:30

भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या रोमांचक स्थितीमध्ये आली आहे. पहिला सामना मोठ्या अंतराने गमावल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करताना

'Nothing to lose, it is everything ...' | ‘खोना कुछ नही, पाना सब कुछ है...’

‘खोना कुछ नही, पाना सब कुछ है...’

Next

मुंबई : भारत-आॅस्ट्रेलिया कसोटी मालिका सध्या रोमांचक स्थितीमध्ये आली आहे. पहिला सामना मोठ्या अंतराने गमावल्यानंतर टीम इंडियाने जबरदस्त पुनरागमन करताना कांगारुंना पाणी पाजले. एकवेळ आॅस्टे्रलियाचा दबदबा राहणार, असे दिसत असताना भारतीय संघाने आपल्या हुकमी फिरकी अस्त्राच्या जोरावर बाजी पलटवून मालिकेत १-१ अशी महत्त्वपूर्ण बरोबरी साधली. त्यामुळे, साहजिकच आॅस्टे्रलियावर पुन्हा एकदा दडपण आलं असून, जबरदस्त आत्मविश्वास वाढलेल्या ‘विराट सेने’चे तगडे आव्हान त्यांना पार करायचे आहे. या सर्व घडामोडीनंतरही मालिकेत बाजी कोण मारणार? असा मोठा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडला आहे आणि यासाठीच ‘लोकमत’ने क्रिकेटतज्ज्ञ आणि ज्येष्ठ क्रीडा पत्रकार अयाझ मेमन यांच्यासोबत लाईव्ह फेसबुक चॅटचे आयोजन केले होते.
त्यांच्याशी केलेली बातचीत...

प्रश्न: मालिका विजयासाठी
भारताला पसंती आहे, पण...
‘खोना कुछ नही, पाना सबकुछ है...’ अशा स्थितीमध्ये टीम इंडिया आहे. पहिला सामना वगळता भारताची कामगिरी चांगली आहे. मात्र, आॅस्ट्रेलियादेखील मालिका विजयासाठी सक्षम आहे. आगामी रांची आणि धर्मशाळा येथील सामन्यांत खेळपट्टी फिरकीला साथ देईल. भारताची बलस्थाने फलदांजी आणि फिरकी गोलंदाजी असून, यांच्यावर संघाचा विजय अवंलबून आहे. गत सामन्यात पुजारा आणि रहाणेच्या भागीदारीमुळे सामना लांबला गेला. सामना जितका जास्त वेळ खेळला जाईल, तितकी भारताला विजयाची संधी आहे. मात्र, सामना कमी दिवस चालल्यास भारताला धोकादायक ठरू शकते, जे आपण पहिल्या सामन्यात पाहिले.

प्रश्न : ही मालिका विराटच्या कर्णधारपदाचे भवितव्य ठरवू शकेल?
मालिकेतील विजयामुळे किंवा पराभवामुळे विराटच्या कर्णधारपदावर गदा येईल, असे सध्या तरी दिसत नाही. पण, मालिकेच्या निकालामुळे विराटच्या कर्णधारपदावर एखादा शिक्का नक्की लागू शकेल. विराटबाबत
बोलायचे झाल्यास, एक परिपक्व खेळाडूचे गुण त्याच्यात दिसून येतात. कधी कधी तो पंचाच्या भूमिकेत
जाऊन स्वत:च निर्णय घेतो. मात्र,
विराट हा गरम रक्ताचा खेळाडू
असल्याने त्याने सामनाधिकाऱ्याची मर्यादा ओलांडू नये, ही काळजी घेणे गरजेची आहे.

प्रश्न: कसोटी सामन्यात आक्रमक प्रवृत्ती वाढत आहे, हे कशामुळे?
एखाद्या फलंदाजाने शतक ठोकले, तर ते माझ्यामुळे ठोकले ही मानसिकता भारतीय खेळाडूंची फार आधीपासून आहे. सौरभ गांगुलीनंतर खेळाडूंमधील आक्रमकपणा मोठ्या प्रमाणात मैदानात दिसून आला. आज बीसीसीआय आणि भारतीय खेळाडू दोन्ही पॉवरफूल आहे. खेळाडूंमध्ये आत्मविश्वास मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने मैदानात आक्रमकतेला वाव असल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न : दुसऱ्या कसोटीतील भारताच्या दिमाखदार विजयाबाबत काय सांगाल.
टीम इंडिया नंबर वन आहे. घरच्या मैदानावर खेळताना भारताने विजयी कामगिरी केलेली आहे. मात्र, या मालिकेत पहिल्या सामन्यात दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने साहजिकच टीकेला सामोरे जावे लागले. मात्र, दुसऱ्या सामन्यात दर्जेदार खेळाचे प्रदर्शन करून शानदार विजय मिळवला. यावरुन टीम इंडिया में ‘खास बात है’ असेच म्हणावे लागेल.

प्रश्न: क्रिकेटच्या बदललेल्या फॉरमॅटमुळे कसोटीत फलंदाजांचा संयम सुटत आहे ?
पुणे आणि बंगळुरू सामन्यात खेळपट्टीच निर्णायक ठरली. परिणामी अशा खेळपट्टीवर संयमाने फलंदाजी करण्याचे आव्हान फलंदाजांसमोर असते. हा संयम आॅस्ट्रेलियाच्या मॅट रेनशॉसह पुजारा आणि रहाणेमध्ये दिसून आला. टी-२० मुळे कसोटी सामन्यांवर सकारात्मक परिणाम जाणवू लागले आहेत. गेल्या काही वर्षांतील ७० ते ७५ टक्के कसोटी सामने निकालात निघाले आहेत. त्यातही सर्वाधिक सामने पाच दिवसांपूर्वीच संपले आहेत. एकूणच कसोटी सामन्यांचा निकाल लागतोय, हे महत्त्वाचे आहे.

प्रश्न: कसोटी सामन्यांची ओळख सध्या हरवली जात आहे का ?
नवीन फॉरमॅटमुळे कसोटी क्रिकेट रंगतदार होत असून, निकालाबाबात सकारात्मक परिणाम मिळत आहे. मुळात सततच्या अनिर्णित कसोटी सामन्यांमुळे एकदिवसीय सामने आले. कालांतराने टी-२० प्रकार क्रिकेट रसिकांच्या मनात रुजण्यास सुरुवात झाली. यामुळे कसोटी सामन्यांत मोठ्या प्रमाणात निकाल मिळण्यास सुरुवात झाली. अतिवेगवान क्रिकेटमुळे फलंदाजीसह, क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी यात आक्रमकता आल्याचे दिसून येत आहे.

प्रश्न: भारतीय खेळपट्टीवर विदेशी फिरकीपटूंच्या कामगिरीचे विश्लेषण कसे कराल?
भारतीय खेळाडू विदेशी फिरकीपटूविरुद्ध घरच्या मैदानावर कायम चांगले खेळू शकतात, हा समज चुकीचा आहे. इतिहासात डोकावले असता भारतीय संघाने मोठ्या फरकाने सामना आणि मालिका गमावल्याचे दिसून येईल. प्रतिस्पर्धी संघाकडे चांगला फिरकीपटू असल्यास त्याच्या कामगिरीनुसार भारताला आपल्या कामगिरीत बदल आणि सुधारणा करावी लागेल.

------------
यासोबतच... स्टार फलंदाज रोहित शर्माचे कसोटीमधील भवितव्य?, स्मिथ-विराट डीआरएस वाद? टीम इंडिया आणि आॅस्टे्रलियाचे ‘मॅच विनर’ खेळाडू यांच्याविषयी जाणून घेण्यासाठी क्लिक करा ‘लोकमत’च्या अधिकृत फेसबुक पेजवर...

Web Title: 'Nothing to lose, it is everything ...'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.