'गोल्डन' कमबॅक! अल्कराजशी पराभवाचा वचपा काढत जोकोविचने जिंकलं ऑलिम्पिक सुवर्णपदक!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2024 09:01 PM2024-08-04T21:01:14+5:302024-08-04T21:02:23+5:30
Novak Djokovic wins Gold Medal vs Carlos Alcaraz, Paris Olympics 2024: गेल्या महिन्यात झालेल्या विम्बल्डन फायनलमध्ये कार्लोस अल्कराजने नोवाक जोकोविचचा पराभव केला होता. त्या पराभवाचा जोकोविचने वचपा काढला.
Novak Djokovic wins Gold Medal vs Carlos Alcaraz, Paris Olympics 2024: अनुभवी टेनिसपटू नोव्हाक जोकोविचने आज आपले अपूर्ण स्वप्न केले. त्याने कारकिर्दीत प्रथमच ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकले. जोकोविचने रविवारी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत कार्लोस अल्काराजचा पराभव करून इतिहास रचला. ३७ वर्षीय सर्बियन खेळाडू जोकोविचने अल्काराजचा ७-६(३), ७-६(२) असा सरळ सेटमध्ये पराभव केला. २४ ग्रँडस्लॅम जेतेपदे पटकावणाऱ्या जोकोविचला ऑलिम्पिक पदकाची खूप दिवसांपासून आतुरता होती. त्याने इटलीच्या लोरेन्झो मुसेट्टीचा पराभव करून आपल्या पहिल्या ऑलिम्पिक फायनलमध्ये प्रवेश केला होता. अव्वल मानांकित जोकोविच मागील तीन ऑलिम्पिकमध्ये उपांत्य फेरीत पराभूत झाला होता. पण यावेळी त्याची स्वप्नपूर्ती झाली.
The ultimate title!
— Paris 2024 (@Paris2024) August 4, 2024
He has achieved his quest for gold—Novak Djokovic is the Olympic champion 🥇
-
Le titre ultime !
Il a réussi sa conquête de l'or, Novak Djokovic est champion Olympique 🥇#Paris2024pic.twitter.com/R3DiVXH6BE
जोकोविचने काही दिवसांपूर्वी पार पडलेल्या विम्बल्डन फायनलमध्ये अल्कराजकडून पराभव स्वीकारला होता. त्यानंतर आज त्याला या पराभवाचा 'हिसाब बराबर' करण्याची संधी चालून आली. आतापर्यंत ऑलिम्पिकमध्ये आधीच्या फेऱ्यांमध्येच स्पर्धेबाहेर होणाऱ्या जोकोविचने यावेळी कोणालाही तक्रारीची संधी दिली नाही. पहिल्या मिनिटापासूनच त्याने आक्रमणाचा पवित्रा स्वीकारला. पहिल्या सेट टायब्रेकरमध्ये गेल्यावर त्यात जोकोविचने आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर केला आणि तो सेट जिंकला. दुसरा सेटही दमदार झाला. कोणीही हार मानायला तयार नसल्याने हा सेटही टायब्रेकरपर्यंत गेला. या टायब्रेकरमध्ये जोकोविचने अल्काराजच्या विजयाला ब्रेक लावला आणि दुसरा सेटही जिंकला. त्यामुळेच ७-६(३), ७-६(२) अशा सरळ सेटमध्ये त्याने अल्कराजला पराभव करत दमदार कमबॅक केले.
NOVAK DJOKOVIC IS AN OLYMPIC CHAMPION 🥇🇷🇸#Tennispic.twitter.com/sHU7KLDEtV
— Roland-Garros (@rolandgarros) August 4, 2024