नोवाक जोकोविच यूएस ओपनचा 'किंंग'
By admin | Published: September 14, 2015 09:09 AM2015-09-14T09:09:02+5:302015-09-14T09:13:32+5:30
सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे १० वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. १४ - सर्बियाचा टेनिसपटू नोवाक जोकोविचने यूएस ओपनच्या अंतिम सामन्यात रॉजर फेडररचा पराभव करत स्पर्धेचे जेतेपद पटकावले आहे. जोकोविचचे हे १० वे ग्रँड स्लॅम विजेतेपद आहे.
अमेरिकन ओपनमध्ये रॉजर फे़डररने स्टेन वावरिन्काचा पराभव करत अंतिम फेरीत धडक दिली होती. तर जोकोविचनेहीच सहाव्यांदा अंतिम फेरीत धडक दिली होती. रविवारी रात्री रंगलेल्या या अंतिम सामन्यात पावसाने व्यत्यत आणल्याने सामना उशीराने सुरु झाला. चुरशीच्या लढतीत जोकोविचने फेडररचा ६-४, ५-७, ६-४, ६-४ असा पराभव केला. २०१२ नंतर रॉजर फेडररला अद्याप एकही ग्रँडस्लॅम पटकावता आलेले नाही.