नोव्हाक जोकोविच, सेरेना दुसऱ्या फेरीत
By admin | Published: June 30, 2015 02:05 AM2015-06-30T02:05:26+5:302015-06-30T02:05:26+5:30
जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेले नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स यांनी आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
लंडन : जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेले नोव्हाक जोकोविच व सेरेना विल्यम्स यांनी आज आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर सहज मात करीत विम्बल्डन टेनिस स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत प्रवेश केला. अव्वल मानांकित जोकोविचने पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत एकतर्फी सामन्यात जागतिक क्रमवारीत ३३ व्या स्थानावर असलेल्या जर्मनीच्या फिलिप कोलश्राइबरचा ६-४, ६-४, ६-४ ने पराभव केला. पुढच्या फेरीत त्याची गाठ फिनलँडचा जार्को निमिनेन व आॅस्ट्रेलियाचा लिटन हेविट यांच्यातील विजेत्या खेळाडूसोबत पडणार आहे.
-महिला विभागात सेरेनाने विम्बल्डनचे सहावे
विजेतेपद पटकाविण्याच्या मोहिमेची शानदार सुरुवात करताना पहिल्या फेरीच्या लढतीत मार्गारिटा गासपारयानचा ६-४, ६-१ ने पराभव केला. २०१५ मध्ये आॅस्ट्रेलियन व फ्रेंच ओपन स्पर्धेत जेतेपद पटकावणाऱ्या सेरेनासाठी आॅल इंग्लंडमध्ये गेली दोन वर्षे निराशाजनक ठरली. तिला अनुक्रमे चौथ्या व तिसऱ्या फेरीत पराभव स्वीकारावा लागला. सेरेनाला बुधवारी दुसऱ्या फेरीच्या लढतीत जागतिक क्रमवारीत ९३ व्या स्थानावर असलेल्या हंगेरीच्या टिमिया बाबोसच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. बाबोसने चेक प्रजासत्ताकच्या पेत्रा चेत्कोवस्काचा
७-६, ६-३ ने पराभव केला.
-महिला एकेरीच्या अन्य सामन्यात चेक प्रजासत्ताकची ११ वी मानांकित कॅरोलिना प्लिसकोव्हाने अमेरिकेच्या ईरिना फालकोनीची झुंज ६-४, ४-६, ६-१ ने मोडून काढली तर २३ व्या मानांकित बेलारुसच्या व्हिक्टोरिया अजारेन्काने एस्टोनियाच्या एनेट कोनटावीटवर ६-२, ६-१ ने मात केली. २४ वे मानांकन प्राप्त इटलीची फ्लाविया पेनेटाला कजाखस्तानच्या जारिना दियासविरुद्ध ३-६, ६-२, ४-६ ने पराभव स्वीकारावा लागला. जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या स्पेनच्या कार्ला सुआरेज नवारोला पहिल्या फेरीच्या लढतीत धक्कादायक निकालाला सामोरे जावे लागले. गेल्या वर्षीची ज्युनिअर चॅम्पियन येलेना ओस्तापेनकोने नवारोचा ६-२, ६-० ने पराभव केला.
-पुरुष दुहेरीत भारताचा रोहन बोपण्णा आणि त्याचा रोमानियाचा जोडीदार फ्लोरिन मेर्जियाने अमेरिकेच्या टिम स्मीजॅक व झेक गणराज्यचा जिरी वेसेलीचा सरळ दोन सेटमध्ये ६-३, ७-६ असा ६७ मिनीटात पराभव करून दुसऱ्या फेरीत प्रवेश केला.
-एकेरीमध्ये सिलिचने जपानच्या हिरोकी मोरियाचा ६-३, ६-२, ७-६ ने; तर क्रिरगियोसने अर्जेन्टिनाच्या डिएगो शवाटर्््जमॅनचा ६-०, ६-२, ७-६ ने पराभव केला.