सध्या तरी डोक्यात खेळच; निवृत्ती नाही!, विश्वनाथन आनंदचा पुन्हा निवृत्तीला ‘फुलस्टॉप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 01:34 AM2018-05-14T01:34:22+5:302018-05-14T01:34:22+5:30

बुद्धिबळावर अधिराज्य गाजवणारा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद सध्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चेस आॅलिम्पियाडच्या तयारीला लागला आहे.

Now playing on the head; Vishwanathan Anand's retirement 'fullstop' | सध्या तरी डोक्यात खेळच; निवृत्ती नाही!, विश्वनाथन आनंदचा पुन्हा निवृत्तीला ‘फुलस्टॉप’

सध्या तरी डोक्यात खेळच; निवृत्ती नाही!, विश्वनाथन आनंदचा पुन्हा निवृत्तीला ‘फुलस्टॉप’

Next

सचिन कोरड
पणजी : बुद्धिबळावर अधिराज्य गाजवणारा पाच वेळचा विश्वविजेता विश्वनाथन आनंद सध्या सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या चेस आॅलिम्पियाडच्या तयारीला लागला आहे. या वर्षी तो विश्व चॅम्पियनशीपसाठी पात्र ठरू शकला नाही. त्यामुळे त्याच्या निवृत्तीची चर्चा पुन्हा सुरू झाली. याला मात्र आनंदने पुन्हा ‘फुलस्टॉप’ दिला.
पन्नाशीत पोहोचलेला आनंद म्हणाला, माझ्या डोक्यात सध्या तरी खेळच आहे. निवृत्तीचा विचारही नाही. मी विश्व रॅपिड आणि चेस आॅलिम्पियाडचीतयारी करीत आहे. उल्लेखनीय म्हणजे, आनंदने वय वाढले तरी खेळातील उंची वाढत असल्याचे सांगितले.
पोकर स्पोटर््स लीगचे (पीएसएल) दुसरे सत्र गोव्यात झाले. या स्पर्धेचा ब्रॅँड अ‍ॅम्बेसिडर म्हणून आनंद गोव्यात आला होता. त्या वेळी त्याने ‘लोकमत’ला मुलाखत दिली. प्रत्येक चाल सराईतपणे चालावी तशीच सफाईदार उत्तरे आनंदने दिली.
विश्व चॅम्पियन स्पर्धेच्या पात्रतेसाठीच्या कॅँडिडेटमध्ये तू अपयशी ठरलास. तुझी कितपत निराशा झाली?
असे विचारल्यावर आनंद म्हणाला, हा खेळाचाच एक भाग आहे. थोडी निराशा झाली; पण मी पाच वेळा ही स्पर्धा जिंकलीय. निवृत्तीची चर्चा रंगत असली, तरी माझे लक्ष खेळावरच आहे.
तुझे पुढील ध्येय कोणते?
आनंद- माझ्या डोळ्यापुढे दोन मोठ्या स्पर्धा आहेत. त्यात विश्व रॅपिड आणि चेस आॅलिम्पियाड. सप्टेंबरमध्ये जॉर्जिया येथे ही स्पर्धा होत आहे. २००६ नंतर प्रथमच मी या स्पर्धेत पुनरागमन करीत आहे. त्यामुळे माझ्यासाठी ती खास असेल.
तू विश्व रॅपिड स्पर्धा जिंकलीस. पारंपरिक प्रतिस्पर्धी नॉर्वेच्या मॅग्नस कार्लसनविरुद्धचा सामनातू जिंकलास. जिंकल्यानंतर मनात काय चाललं होतं?
आनंद- मनात... ओ.. मन आणि डोकं हलकं वाटत होतं. व्यक्त करण्यासाठी शब्द नव्हते. खूप प्रतीक्षेनंतर यश मिळाले तर आनंद खूप वेगळाच असतो. तसंच माझ्याबाबतही झालं.
रशिया, युक्रेनसारखे कमी लोकसंख्येचे देश बुद्धिबळात प्रगतिपथावर आहेत. याचे कारण कोणते? आपण का मागे पडतोय?
आनंद- लोकसंख्या हा फॅक्टर विचारात नसावा. रशिया, युक्रेन, नॉर्वे तसेच युरोपमधील देशांमध्ये चेस संस्कृती मोठ्या प्रमाणात रुजली आहे. सर्व खेळाडू प्रोफेशनल आहेत. भारतात तशी संस्कृती निर्माण व्हायची आहे. पण, आज भारतातही दर्जेदार खेळाडू घडत आहेत. मला बुद्धिबळातही चांगले भविष्य दिसतेय.
बुद्धिबळ इतर खेळांप्रमाणे प्रत्येक शाळेत पोहचला नाहीए? त्याबद्दल काय वाटते?
आनंद- काही राज्यांनी या खेळासाठी पुढाकार घेतला असून त्यांनी बुद्धिबळाचा समावेश अभ्यासक्रमातही केलेला आहे. त्यात गोव्यातील काही शाळांचा समावेश आहे. असा पुढाकार इतर राज्यांनी
सुद्धा घ्यायला हवा. मी
वैयक्तिक पातळीवर काही प्रयत्नही केले आहेत. आॅलिम्पिकमध्ये या खेळाचा समावेश झाल्यास दृष्टिकोनही बदलेल.

Web Title: Now playing on the head; Vishwanathan Anand's retirement 'fullstop'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.