आता लक्ष्य आॅलिम्पिक पदक : दीपा करमाकर

By admin | Published: April 20, 2016 03:24 AM2016-04-20T03:24:19+5:302016-04-20T03:24:19+5:30

आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकरने आता आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे लक्ष्य

Now target Olympic medal: Deepa Karmakar | आता लक्ष्य आॅलिम्पिक पदक : दीपा करमाकर

आता लक्ष्य आॅलिम्पिक पदक : दीपा करमाकर

Next

रिओ जानेरिओ : आॅलिम्पिकसाठी पात्रता मिळविणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेली दीपा करमाकरने आता आॅगस्टमध्ये होणाऱ्या रिओ आॅलिम्पिकमध्ये पदक पटकाविण्याचे लक्ष्य असल्याचे म्हटले आहे. दीपाने आॅलिम्पिक पात्रता स्पर्धेत सोमवारी ५२.६९८ गुणांची कमाई करीत रिओ आॅलिम्पिकमध्ये कलात्मक जिम्नॅस्टिकसाठी पात्रता मिळविली.
दीपाने आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्टिक महासंघाच्या अधिकृत फेसबुकवर म्हटले आहे की,‘सुवर्णपदक पटकाविण्यापेक्षा दुसरा कुठला चांगला अनुभव असू शकत नाही. माझे पुढचे लक्ष्य आॅलिम्पिक पदक जिंकण्याचे आहे.’ दीपाने व्होल्ट््स फायनलमध्ये सुवर्णपदक पटकाविले. तिने २००८च्या आॅलिम्पिक स्पर्धेतील रौप्यपदक विजेत्या उजबेकिस्तानच्या ओकसाना सीचा पराभव केला. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारताच्या ११ पुरुष जिम्नॅस्टनी आॅलिम्पिकमध्ये सहभाग नोंदविला आहे, पण जिम्नॅस्टिकमध्ये प्रथमच भारतीय महिला आॅलिम्पिकमध्ये सहभागी होणार आहे. (वृत्तसंस्था)
> कटरा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आॅलिम्पिकसाठी पात्रता गाठणारी पहिली भारतीय महिला जिम्नॅस्ट ठरलेल्या दीपा करमाकरची प्रशंसा केली. या खेळाडूने आपल्या दृढ निर्धाराने देशाची मान उंचावली, अशा शब्दांत मोदी यांनी दीपाची प्रशंसा केली.
श्री माता वैष्णोदेवी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलताना पंतप्रधान म्हणाले,‘दीपाने देशाची मान उंचावली. प्रथमच देशाच्या मुलीची आॅलिम्पिकमध्ये जिम्नॅस्टिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सुविधांचा अभाव असतानाही तिने मिळवलेले यश उल्लेखनीय आहे. जीवनात वाटचाल करण्यासाठी दृढ संकल्प असणे गरजेचे असते. या मोहिमेत सुविधांचा अभाव अडथळा बनायला नको.’

Web Title: Now target Olympic medal: Deepa Karmakar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.