सार्क बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला सुवर्ण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 02:00 PM2019-12-11T14:00:35+5:302019-12-11T14:50:49+5:30

आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन मिळाले होते.

Nubair Shah Sheikh Gold in SAARC Chess Tournament | सार्क बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला सुवर्ण 

सार्क बुद्धिबळ स्पर्धेत नुबैरशाह शेखला सुवर्ण 

Next

ठाणे : ठाण्याचा आंतरराष्ट्रीय मास्टर नुबैरशाह शेखने आपले वर्चस्व राखताना बांगलादेशाची राजधानी ढाका येथे रंगलेल्या पहिल्या सार्क आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णपदकाला गवसणी घातली. या यशाबद्दल नुबैरशाहला सुवर्णपदकासह तीन हजार पाचशे अमेरिकन डॉलर्सचा पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

आठ देशांच्या ८८ बुद्धिबळपटूचा सहभाग लाभलेल्या या स्पर्धेत नुबैरशाहला तिसरे मानांकन मिळाले होते. सुरुवातीच्या सामन्यांमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या नुबैरशाहसमोर सातव्या फेरीत पाकिस्तानचा अव्वल मानांकित आंतरराष्ट्रीय मास्टरमहेमूद लोधीचे आव्हान होते. सामन्यात पांढऱ्या मोहऱ्यानिशी खेळणाऱ्या लोधीने आक्रमक सुरुवात केली होती. त्याला नुबैरशाहने स्लॉव्ह बचावाने उत्तर देत लोधीला विचार करण्यास भाग पाडले. त्यांनतर लोधीने फियानचेट्टी व्हेरिएशन पद्धतीने खेळ करत सामन्यात वर्चस्व मिळवण्याचा प्रयत्न केला. पण लोधीचा हा प्रयत्न हाणून पडताना नुबैरशाहने घोड्याची चाल खेळत सामन्यात रोमांचकारी स्थिती निर्माण केली.  त्यात  नुबैरशाहने एकापेक्षा एक सरस चाली रचत बचावात्मक खेळ  करणाऱ्या लोधीला  सामना मध्यावर सोडण्यास भाग पाडले. या विजयामुळे सात गुणांसह स्पर्धेतील विजेतेपदाकडे घेऊन जाणारी निर्णायक एक गुणांची आघाडी नुबैरशाहने मिळवली. 

या आघाडीनंतर शेवटच्या नवव्या फेरीत नुबैरशाहचा सामना बांगलादेशचा ग्रँडमास्टर आणि स्पर्धेतील 
अव्वल मानांकित झिया उर रहमानशी झाला. या सामन्यात नुबैरशाहला  काळ्या मोहऱ्यांनिशी डावाची सुरुवात करावी लागली.त्यात त्याने सिसिलियन बचाव पद्धत अवलंबवत रहमानला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. नुबैरशाहने त्यानंतर अँड्रफ व्हेरिएशन आणि थ्रेफॉल व्हेरिएशन  स्थिती तयार करत विजेतेपदावर आपल्या नावाची मोहर उमटवण्यासाठी आवश्यक  असलेला गुण निश्चित करत सामना बरोबरीत राखला. आपल्या खात्यात १८ वे आंतरराष्ट्रीय पदक जमा केले.

Web Title: Nubair Shah Sheikh Gold in SAARC Chess Tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :thaneठाणे