नंबर गेम
By admin | Published: February 23, 2015 02:23 AM2015-02-23T02:23:36+5:302015-02-23T02:23:36+5:30
१०७५ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माहेला जयवर्धनेने १०७५ धावा पूर्ण केल्या. एक हजार धावा करणाऱ्यांच्या श्रीलंकेच्या यादीत तो चौथा फलंदाज आहे.
१०७५ विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत माहेला जयवर्धनेने १०७५ धावा पूर्ण केल्या. एक हजार धावा करणाऱ्यांच्या श्रीलंकेच्या यादीत तो चौथा फलंदाज आहे.
५६ जयवर्धनेची विश्वचषक स्पर्धेतील २००७ पासूनची सरासरी ५६ आहे. त्याने २० डावांमध्ये ९५२ धावा केल्या आहेत. विश्वचषक १९९९ व २००३ मधील ११ डावांत त्याने ११.१८ च्या सरासरीने १२३ धावा केल्या.
५८* जीवन मेंडिस व तिसारा परेरा यांनी ७व्या विकेटसाठी केलेली ५८ धावांची नाबाद भागीदारी श्रीलंकेकडून केलेली विक्रमी खेळी आहे.
०२ एखाद्या संघाचे पहिले दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही दुसरी वेळ आहे. यापूर्वी २००६ मध्ये गयाना येथे झिम्बाब्वेचे पेट रिंके व टेरी डूफिन बाद झाले होते.
०३ श्रीलंका संघाचे पहिले दोन्ही फलंदाज शून्यावर बाद होण्याची ही तिसरी वेळ आहे. यापूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पर्ल आणि भारताविरुद्ध शारजा येथे.
८८ असघर स्तानिक्झाई व सॅमीउल्लाह शेनवारी यांनी ओडीआयमध्ये कसोटी संघाविरुद्ध केलेली ८८ धावांची भागीदारी दुसरी सर्वाधिक धावसंख्या आहे. या आधी या जोडीने २०१४ मध्ये एशिया कप स्पर्धेत बांगलादेशविरुद्ध १६४ धावांची भागीदारी केली होती.
५४ स्तानिक्झाईने आज श्रींकेविरुद्ध केलेल्या ५४ धावा, ओडीआयमधील दुसऱ्यांदा, पहिल्या आठ क्रमांकामध्ये असलेल्या संघाविरुद्ध केलेली सर्वाधिक धावसंख्या आहे. यापूर्वी त्यानेच २०१२ मध्ये शारजा येथे आॅस्ट्रेलियाविरुद्ध ६६ धावा केल्या होत्या.
८६ अफगाणिस्तान संघाने २० षटकांनंतर दुसऱ्यांदा केलेली सर्वाधिक धावसंख्या. सन २०१२ मध्ये त्यांनी शारजा येथे पाकिस्तानविरुद्ध ९५ धावा केल्या होत्या.
०१ अफगाणिस्तान संघाच्या पहिल्या आठ फलंदाजांनी १० पेक्षा जास्त धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.