आश्विन कसोटीत नंबन-१ ‘आॅलराउंडर’

By admin | Published: August 12, 2014 01:32 AM2014-08-12T01:32:52+5:302014-08-12T01:32:52+5:30

भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा कोसटी क्रिकेटमध्ये नंबर-१ ‘आॅलराऊंडर’ बनला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीत फलंदाजीत देखणी कामगिरी केल्यामुळे त्याला हे स्थान मिळाले.

Number-one all-rounder in Ashwin Test | आश्विन कसोटीत नंबन-१ ‘आॅलराउंडर’

आश्विन कसोटीत नंबन-१ ‘आॅलराउंडर’

Next

दुबई : भारताचा फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विन हा कोसटी क्रिकेटमध्ये नंबर-१ ‘आॅलराऊंडर’ बनला आहे. इंग्लंडविरुद्ध मँचेस्टर येथे चौथ्या कसोटीत फलंदाजीत देखणी कामगिरी केल्यामुळे त्याला हे स्थान मिळाले.
अश्विनने ओल्ड ट्रॅफर्ड येथे पहिल्या डावात ४० आणि दुसऱ्या डावात नाबाद ४६ धावा ठोकल्या. पण भारताने ही कसोटी एक डाव ५४ धावांनी गमावली. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने १४ षटके गोलंदाजी केली पण एकही गडी बाद करता आला नव्हता. अश्विनचे ३७२ रेटिंग गुण झाले असून, त्याने द. आफ्रिकेचा खेळाडू व्हर्नोन फिलँडरला मागे टाकले. बांगलादेशचा साकिब अल हसन तिसऱ्या, इंग्लंडचा स्टुअर्ट ब्रॉड चौथ्या आणि आॅस्ट्रेलियाचा मिशेल जॉन्सन पाचव्या स्थानावर आहे.
दरम्यान, लंकेचा फलंदाज कुमार संगकारा याने पाकविरुद्ध पहिल्या कसोटीत गाले येथे दहावे दुहेरी कसोटी शतक ठोकून कसोटी क्रमवारीत दुसऱ्यांदा अव्वल स्थान पटकावले. भारताचा चेतेश्वर पुजारा आणि विराट कोहली यांना मात्र फटका बसला. सन २०१२ चा आयसीसीचा सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू तसेच यंदाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू राहिलेल्या संगकाराने २२१ आणि २१ धावा ठोकल्याने त्याला ३१ गुण मिळाले. त्याने द. आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स याला पहिल्या स्थानावरून मागे खेचले.
डिव्हिलियर्स २०१३ मध्ये आपलाच सहकारी हशिम अमला याला मागे सारून ३३ कसोटीतील २८७ दिवस अव्वल स्थानावर विराजमान होता. अखेरची मालिका खेळत असलेला माहेला जयवर्धने याने ५९ आणि २६ धावा करीत १४ वे स्थान कायम राखले. पुजाराला दोन स्थानाचा फटका बसल्याने तो मात्र १२ व्या तर कोहली २० व्या स्थानावर आहे.
गोलंदाजीत इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जेम्स अ‍ॅण्डरसन पाचव्या, ब्रॉड नवव्या, अश्विन १३ व्या, प्रज्ञान ओझा १५ व्या आणि ईशांत शर्मा २०व्या स्थानावर आहेत. (वृत्तसंस्था)

Web Title: Number-one all-rounder in Ashwin Test

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.