मुंबई इंडियन्स ट्वेंटी-20मध्ये ठरली नंबर वन
By admin | Published: April 25, 2017 06:35 PM2017-04-25T18:35:35+5:302017-04-25T18:35:35+5:30
यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 25 - यंदाच्या आयपीएलमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असलेल्या मुंबई इंडियन्सने ट्वेंटी-20 क्रिकेटमध्ये मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. आयपीएलमधील मुंबई इंडियन्स हा संघ जगातील सर्वाधिक टी-20 सामने खेळणारा संघ ठरला आहे.
सोमवारी मुंबई इंडियन्सने 170वा सामना खेळून हा विश्वविक्रम स्वतःच्या नावावर केला. टी-20 क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्सने 97 सामन्यांत विजय मिळवला आहे. मात्र 71 सामन्यांमध्ये त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. तर दोन सामने बरोबरीत सुटले आहेत.
मुंबईने 170वा सामना हा पुणे सुपरजायंटविरोधात खेळला होता. या सामन्यात मुंबई इंडियन्सवर 3 धावांनी पराभव पत्करण्याची नामुष्की ओढावली. मुंबई इंडियन्सने आतापर्यंत रायझिंग पुणे सुपरजायंटविरोधात सर्वच सामने जिंकले आहेत. मात्र सोमवारी घरच्या मैदाना(वानखेडे स्टेडियम)वर मुंबई इंडियन्सचा पराभव झाला.
मुंबई इंडियन्सनं भेदक गोलंदाजीच्या जोरावर पुण्याला 6 बाद 160 धावांवर रोखलं होतं. मात्र त्यानंतर मुंबई इंडियन्सनं लागोपाठ बळी टाकण्यास सुरुवात केली. याच सामन्यात सलामीचा फलंदाज रोहित शर्मानं आयपीएलच्या कारकिर्दीतील 30वं अर्धशतक साजरं केलं होतं. बेन स्टोक्सला चांगली फलंदाजी करत पुणे रायझिंग सुपरजायंटला हा विजय मिळवून दिला होता.