बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

By admin | Published: March 7, 2017 09:03 PM2017-03-07T21:03:37+5:302017-03-07T21:28:45+5:30

मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला

Objection to BCCI employees for three crore | बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

बीसीसीआय कर्मचाऱ्यांना तीन कोटी वाटण्यावर आक्षेप

Next

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 7 : मागच्या वर्षी झालेल्या टी-२० विश्वचषकादरम्यान विविध पदावर काम करणाऱ्या ३२ कर्मचाऱ्यांना तीन कोटी मानधन वाटपाच्या बीसीसीआयच्या प्रस्तावावर कोषाध्यक्ष अनिरुद्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी यांनी २८ फेब्रुवारी रोजी ईमेलद्वाारे विश्वचषकातील कामिगरीचा मोबदला म्हणून विशेष बक्षीस देण्याचा प्रस्ताव
मांडला होता. बक्षिसाची ही रक्कम ३.३ कोटी इतकी आहे. प्रस्तावावर खजिनदार अनिरु द्ध चौधरी यांनी तीव्र आक्षेप नोंदवला असून प्रस्तावाला मान्यता कशी काय देण्यात आली? यामध्ये फेरफार असल्याचे सांगत ताशेरे ओढले.

राहुल जोहरी यांनी बीसीसीआयचे मुख्य आर्थिक अधिकारी (सीएफओ) संतोष रांगणेकर व सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या प्रशासकीय समितीचे (सीओए) सदस्य विक्र म लिमये तसेच बोर्डाचे वकील आदर्श सक्सेना यांना मेल पाठवला होता. प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीने मान्यता दिली असून आर. पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर या दोन संचालकांनी हा प्रस्ताव प्रमाणित केल्याचे जोहरी यांनी ईमेलमध्ये म्हटले होते. ज्या ३२ जणांना हे विशेष आर्थिक बक्षीस देण्यात येणार आहे त्यामध्ये आर.पी. शहा आणि एम.व्ही. श्रीधर यांचाही समावेश आहे. या दोघांनाही प्रत्येकी ५५ हजार डॉलर मिळणार आहेत. त्यामुळेच चौधरी यांनी अनेक शंका उपस्थित केल्या.

शहा आणि श्रीधर यांनी नक्की काय प्रमाणित केले, याबद्दल मला शंका आहे. ही विशेष रक्कम संबंधित लोकांना दिली जावी, यालादेखील त्यांनीच मान्यता दिली आहे का, असा सवाल चौधरी यांनी उपस्थित केला. बीसीसीआयकडून आर्थिक बक्षीस देण्यात येणाऱ्यांमध्ये दिल्लीचे माजी पोलीस आयुक्त नीरज कुमार यांचा समावेश आहे. त्यांनी बीसीसीआयच्या भ्रष्टाचारविरोधी पथकाच्या सल्लागाराची भूमिका पार पाडली होती. त्यामुळे त्यांना बीसीसीआयकडून २० हजार डॉलर देण्यात येणार आहेत. रत्नाकर शेट्टी
यांना २० हजार डॉलर मिळणार आहेत. याशिवाय, संबंधित लोकांच्या कार्यालयांतील शिपायांना पाच हजार डॉलर आणि अनेक कर्मचाऱ्यांवर तीन हजार डॉलरची खैरात करण्यात येणार आहे. प्रस्तावात अनेक त्रुटी असून भविष्यात ते सिद्ध झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल चौधरी यांनी विचारला आहे. टी-२० विश्वचषक केवळ ३२ लोकांमुळेच यशस्वी झाला का, असा
सवाल चौधरी यांनी उपस्थित केला.

Web Title: Objection to BCCI employees for three crore

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.