वेळापत्रकावरून प्रेक्षक, फोटोग्राफर, पत्रकार नाराज; प्रवासातच जातो जास्त वेळ

By admin | Published: August 10, 2016 09:22 PM2016-08-10T21:22:27+5:302016-08-10T21:22:27+5:30

हियोडोरा, मराकाना, कोपाकाबाना, रियो सेंट्रो या ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. या स्पर्धांच्या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुध्दा आहे. पण, एका ठिकाणीवरून

Observers, photographers, journalists angry over schedule; The journey is much longer | वेळापत्रकावरून प्रेक्षक, फोटोग्राफर, पत्रकार नाराज; प्रवासातच जातो जास्त वेळ

वेळापत्रकावरून प्रेक्षक, फोटोग्राफर, पत्रकार नाराज; प्रवासातच जातो जास्त वेळ

Next
>   - शिवाजी गोरे    
(थेट रियो येथून)  
 
 हियोडोरा, मराकाना, कोपाकाबाना, रियो सेंट्रो या ठिकाणी विविध खेळांच्या स्पर्धा आयोजित केल्या जात आहे. या स्पर्धांच्या ठिकाणी जाण्यासाठी बस सेवा सुध्दा आहे. पण, एका ठिकाणीवरून दुस-या ठिकाणी जाण्यासाठी मध्य असलेल्या एमपीसी (मुख्य पत्रकार कक्ष येथे यावे लागत असल्यामुळे या स्पर्धेचे वार्तांकन करण्यासाठी आलेले पत्रकारात व छायाचित्र काढणारे     फोटोग्राफ यांना स्पर्धेच्या वेळापत्रकानुसार एका ठिकाण्यावरून दुसºया ठिकाणी पाहोचण्यास जिवाचा आटापिटा तर करावा लागत असल्यामुळे त्यांनी नाराज व्यक्त केली आहे. 
या स्पर्धेचा संपूर्ण कार्यक्रम करताना विविध खेळांचे आंतरराष्टÑीय तांत्रिक अधिकारी ज्यांनी हा कार्यक्रम तयार केला त्यांनी वेळेचा व अंतराचा विचार करायला हवा होता, असे विविध देशातून आलेल्या पत्रकारांनी व फोटोग्राफरांनी लोकमतकहे आपले म्हणणे मांडले. मंगळवारी रोर्इंगची स्पर्धा लोगावा येथे तर हॉकीची स्पर्धा डियोडोरा या ठिकाणी होती. सर्वांना बसची व्यवस्था  एमपीसी (मुख्य पत्रकार कक्ष) येथिल होती. एमपीसी ते लोगावा हा प्रवास सुमारे सुमारे ४० मिनिटाचा आहे. एमपीसी ते डियोडोरो हा सुध्दा प्रवास अंदाजे ४५ ते ५० मिनिटाचा आहे. ज्या फोटोग्राफरांना आपल्या देशाच्या खेळाडूंचे फोटो काढण्यासाठी किंवा वार्तांकनासाठी सकाळी लोगावा येते रार्इंगला जायचे होते त्यांना जर हॉकी सामन्याचे फोटो काढायचे किंवा पत्रकारांना वार्तांकन करायला जायचे असेल तर ते वेळेवर पोहोचू शकत नव्हते. कारण रार्इंग सकाळी ८.३० वाजता तर हॉकी सकाळी ११ वाजत सुरू होणार होता. रोर्इंगची स्पर्धा सुमारे एक ते दोन तास चालणार होती. त्यामुळे जे फोटोग्राफर लोगावाला गेले त्यांना डियोडोराला वेळेत पोहोचता आले नाही त्यामुळे काही फोटोग्राफरांना हॉकीचे फोटो काढता आले नाहीत. एमपीसी जर मध्य धरला तर ज्या ठिकाणी या स्पर्धेंची ठिकाणे आहेत ते सर्व विरूद्द दिशेला आहेत. त्यामुळे फोटोग्राफर यांची हेलपाट्यावारी मरतय शिंगरू अशी स्थिती झाली आहे. आशा मोठ्या स्पर्धांचा क्रार्यक्रम एकदा निश्चित झाल्यावर तो बदलता येत नाही. त्यामुळे यासर्वांवर मुग गिळून गप्प बसºयाची वेळ आली आहे. 
यासंदर्भात बसमध्ये भेटलेले  दक्षिण आफ्रिकेच फोटोग्राफर सिन मॉरिस व  काही भारतीय फोटोग्राफरांनी लोकमत ला सांगितले की. यावर्षीच्या या स्पर्धेचा कार्यक्रम खुप टाईट आहे. आणि स्पर्धांची ठिकाणे लांब आहेत. बसची व्यवस्था आहे. त्या बससाठी वेळी लेन सुध्दा आहे पण वेळ कमी मिळतो त्यामुळे खूप ओढातान होते. एका ठिकाणावरून दुसºया ठिकाणी पोहोचण्यासाठी  खूप धावपळ करावी लागते. कार्यक्रम आखताना वेळेचा आणि स्पर्धांच्या ठिकाणाचा जरा विचार केला असता तर एवढा त्रास नसता झाला. लंडन आॅलिम्पिकमच्या वेळी एवढी धावपळ झाली नाही. तेथिल व्यवस्था सुध्दा चांगली होती. वेळा पत्रकाचे नियोजन अशा पध्दतीने केले होते की कोणालाही कसलाही त्रास किंवा धावपळ करावी लागली नाही आणि मुख्य म्हणजे काणीी कसलीही तक्रार केली नाही. मिळालेली स्पर्धा कशीबशी एकदाची  पार पाडायची असे सर्व प्रयत्न सुरू आहेत.     
 
* रियो डायरी : 
* भाषेची सर्वांनाच अडचण 
या स्पर्धेच्या निमित्ताने येथे स्वयंसेवक म्हणून काम करीत असलेल्या रियो दि जानेरीयामधील महाविद्यालया विद्यार्थ्यांना खास इंग्रजी बोलण्याचे प्रशिक्षण दिले गेले होत. पण, तोडक्या,मोडक्या इंग्रजीचा परदेशी खेळाडू आणि क्रीडाप्रेमींना त्याचा काहीच फायदा होत नाही त्यामुळे सर्वांचीच अडचण होत आहे. तेथे ब्राझीलीयन किंवा पोर्तुगाल भाषा जास्त बोलली जाते. जर कोणाला काही विचारयचे असेल तर त्याच्या कार्डवर जर आय कॅन टॉक इंग्लिश असे जर लिहिले असेल तरच त्याच्या बरोबर बोलून फायदा आहे असे समजायचे अन्यथा काहीच बोलायचे नाही. 
* हवामानाची दिवसात वेगवेगळी तºहा 
सकाळी थंड हवा, दुपारी उन आरि सायंकाळी पुन्हा थंड हवा अशी येथिल हवामानाची परिस्थिती आहे. गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरन सुध्दा अदुभवायला मिळाले. उन कडक जानवते, थंडी मात्र बोचरी असते.  येथिल नागरीक सकाळ असो वा दुपार रस्त्यावरून अनेक जर पळत असताना दिसात. त्याच बरोबर पुरूष, महिला आणि मुले-मुली खास तयार करण्यात आलेल्या सायकल ट्रॉकवरून सायकल चालविताना दिसतात. सायंकाळच्या वेळी हॉटेल किंवा पबच्या समोर मुला-मुलींचे  घोळके जमा झालेले दिसतात. रस्त्यावर पळणारे सुध्दा रात्री दिसतात.      
 
* शाळा, महाविद्यालयांना सुट्टी
आॅलिम्पिक स्पर्धेच्या निमित्ताने येथिल शाळा  आणि महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यामुळे स्पर्धा पाहण्यासाठी लहान मुला-मुलींपासून ते मोड्यापर्यंत लोंढेच्या लोढे स्पर्धा पाहण्यासाठी येत आहेत. या मुला-मुलींना कंटाळा येऊ नये म्हणून स्पर्धेच्या ठिकाणी मोकळ्या जागेत सांबा नृत्याची व्यवस्था सुध्दा करण्यात आली आहे. त्याच इतरही काही सांंस्कृतीक कार्यक्रमचे आयोजन केले जात आहे. शाळांना सुट्टी दिल्यामुळे प्रत्येक स्टेडियमचा परिसर भरून जात आहे. पण ही गर्दी फक्त स्टेडियमच्या मोकळ्या जागेतच दिसत आहे आत सामने पाहण्यासाठी थोडेच प्रेक्षक हजेरी लावतात.  
 
* भारतीय खेळाडूंचे दिनांक  ११ आॅगस्टचे  वेळापत्रक : 
* बॅडमिंटन : (सर्वांचे सामने दुपारी ४.३० पासून सुरू होतील.) 
    - पुरूष : एकेरी :  के. श्रीकांत, मनू अत्री, सुमीत रेड्डी, महिला : एकेरी : सायना नेहवाल, पी. व्हि. सिंधू, दुहेरी : ज्वाला गुट्टा- अश्विनी पोनप्पा 
* आर्चरी : 
 - महिला : बंबोलया देवी वि. बालडाफू  रात्री १.२७ वा. 
 - जर या दिपिका जिंकली तर तिचा पुढची लढत ग्युडालिना सारटोरी व कॅरोलिना ए. यांच्यातील विजेत्या विरूध्द होईल. - रात्री १.५३ वा.       
 * ज्युदो : 
पुरूष : ९० किलो गट - अवतार सिंग वि. पापोल मिसेगा : सायं. ७.३० वा. 
* मुष्टीयुध्द :   
 - पुरूष : शिव थापा - ५६ किलो गट : सायं. : ७.३० वा. 
  - मनोज कुमार : ६४ किलो : रात्री : ८.१५  
* गोल्फ : अनिर्बन लाहिरी :      सायं. ४ वा.     
 * हॉकी : पुरूष : भारत वि. नेदरलॅँड सायं. ६.३० वा. 
महिला : भारत वि. अमेरिका : १२ आॅगस्ट पहाटे ४ वा. 
 

Web Title: Observers, photographers, journalists angry over schedule; The journey is much longer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.