क्रीडाग्राममध्ये आढळला कोरोना रुग्ण; अधिकारी पॉझिटिव्ह, टोकियो ऑलिम्पिकवर भीतीचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2021 08:32 AM2021-07-18T08:32:33+5:302021-07-18T08:33:51+5:30

कोरोनाच्या दहशतीत पुढच्या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे.

officers at tokyo olympics found corona test positive | क्रीडाग्राममध्ये आढळला कोरोना रुग्ण; अधिकारी पॉझिटिव्ह, टोकियो ऑलिम्पिकवर भीतीचे सावट

क्रीडाग्राममध्ये आढळला कोरोना रुग्ण; अधिकारी पॉझिटिव्ह, टोकियो ऑलिम्पिकवर भीतीचे सावट

googlenewsNext

टोकियो : कोरोनाच्या दहशतीत पुढच्या आठवड्यापासून सुरू होत असलेल्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेसमोर मोठे संकट निर्माण झाले आहे. कोरोनामुळे पुढे ढकलण्यात आलेल्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडाग्राममध्ये कोरोनाने प्रवेश केला आहे. शनिवारी येथे पहिला रुग्ण आढळला. यामुळे खळबळ उडाली असून, या वृत्तास आयोजकांनी दुजारो दिला आहे. एक अधिकारी कोरोनाबाधित आढळून आला असून, त्याला क्वारंटाइन करण्यात आले आहे.

‘ऑलिम्पिक ग्राममध्ये एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली आहे. चाचण्या केल्या जात असताना संसर्ग झालेला रुग्ण आढळून आला असून, हा पहिलाच रुग्ण असल्याची माहिती टोकियो ऑलिम्पिक समितीचे प्रवक्ते मासा टाकाया यांनी दिली. भारतीय संघाचे शनिवारी टोकियोमध्ये आगमन झाले. काही भारतीय खेळाडूंच्या सरावाला सुरुवातही झाली.

द. कोरियाचे बॅनर काढले

१६व्या शतकात जपानविरुद्ध झालेल्या युद्धाचा उल्लेख असलेले द. कोरियाने लावलेले बॅनर आयओसीच्या निर्देशानंतर क्रीडाग्राममधून हटविण्यात आले. जपानच्या उगवत्या सूर्याचा ध्वजदेखील ऑलिम्पिक आयोजन स्थळी दिसणार नाही, असे आश्वासन मिळताच कोरियाच्या ऑलिम्पिक समितीने आपले बॅनर मागे घेण्याचा निर्णय घेतला.

नायजेरियाचा पॉझिटिव्ह खेळाडू रुग्णालयात

टोकियो ऑलिम्पिकसाठी शुक्रवारी नायजेरियाच्या खेळाडूंचे पथक नारिता विमानतळावरून टोकियोला रवाना होणार होते. पथकातील एक सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्यानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या व्यक्तीला सौम्य लक्षणे होती, मात्र वय जास्त असल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
 

Web Title: officers at tokyo olympics found corona test positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.