ऑलिम्पिक बॉक्सिंग सराव स्पर्धा; थापा, पूजाला ‘सुवर्ण’, आशिषला रौप्यपदक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2019 03:36 AM2019-11-01T03:36:37+5:302019-11-01T03:36:53+5:30
चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव याच्यावर ५-० ने मात केली
टोकियो: येथे सुरु असलेल्या ऑलिम्पिक सराव स्पर्धेत भारतीय बॉक्सर्सनी शानदार कामगिरी केली. पुरुष गटात शिव थापा याने ६३ किलो वजन गटात आणि महिलांमध्ये पुजा राणीने ७५ किलो वजन गटात सुवर्णपदके जिंकली. ६९ किलो वजनगटात मात्र भारताीय बॉक्सर आशिषला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.
चार वेळा आशियाई क्रीडा स्पर्धेचे विजेतेपद पटकावणाऱ्या शिव थापाने कझाकस्तानचा राष्ट्रीय चॅम्पियन संताली टोयत्येव याच्यावर ५-० ने मात केली. दुसरीकडे पुजा राणीने आॅस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्करवर मात करीत सुवर्णपदकाची कमाई केली. मात्र आशिषला जपानच्या सेवॉन ओकाझावाकडून पराभवाचा सामना करावा लागला. थापा माजी राष्टÑीय विजेता आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्य विजेता राहीला आहे.
आशियाई स्पर्धेतील कास्यपदक विजेती पूजा राणीने ७५ किलो वजन गटात अंतिम सामन्यात आॅस्ट्रेलियाच्या कॅटलिन पार्कर हिला ४-१ असे पराभूत केले. याआधी माजी ज्युनियर विश्वविजेती निकहत जरीन(५१ किलो), सिमरनजीत कौर(६०), समित सांगवान(९१), वाहलीमपुइया (७५ ) यांचा बुधवारी उपांत्य फेरीत पराभव झाल्याने कांस्यवर समाधान मानावे लागले.
मागील वर्षभरापासून शिव थापा खूपच परिपक्व खेळाडू बनला आहे. त्याच्या कामगिरीतूनच ते दिसते. सध्या तो चांगल्या फॉर्ममध्ये आहे. आशिषनेही खूप चांगली कामगिरी केली आहे. सिनियर स्तरावरील त्याचा खेळ प्रभावित करणारा आहे. - सी.ए. कुटप्प, राष्टÑीय प्रशिक्षक