Neeraj Chopra: मोठी बातमी! ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा तापानं फणफणला, कोरोना चाचणी निगेटिव्ह
By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 03:58 PM2021-08-14T15:58:49+5:302021-08-14T16:00:47+5:30
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणारा भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्रा तापाने फणफणला आहे. सुदैवानं त्याची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली आहे. पण नीरजच्या आजाराचं नेमकं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. नीरज चोप्रानं टोकियो ऑलिम्पिकमध्ये भालाफेक स्पर्धेत पुरूष गटात भारतासाठी सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. (Olympic gold medal winning javelin thrower Neeraj Chopra down with high fever, tests negative for Covid 19)
सुवर्णपदक विजेत्या नीरज चोप्रानं पुन्हा उंचावली भारताची मान; जाणून तुम्हालाही वाटेल अभिमान!
नीरज चोप्रा भारतात दाखल झाल्यानंतर विमानतळावरही त्याचं जोरदार स्वागत करण्यात आलं होतं. दरम्यान, सुवर्ण पदक जिंकल्यानंतरच्या एका मुलाखतीत नीरजचनं पदक जिंकल्यानंतरचा दुसरा दिवस अतिशय कठीण गेला होता. संपूर्ण शरीर दुखत होतं असं म्हटलं होतं. ऑलिम्पिकसाठीची तयारी आणि त्यानंतरचा व्याप यामुळे अतिताणामुळे नीरजला ताप आला असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
मेहनतीने घाम गाळून ‘गोल्डन बॉय’ बनलोय- नीरज चोप्रा
नीरजनं टोकियो ऑलिम्पिकमध्ये ८७.५८ मीटर लांबीवर भाला फेकून सुवर्ण पदकावर नाव कोरलं होतं. तर रौप्य आणि कांस्य पदकावर चेक रिपब्लिकच्या खेळाडूंनी कब्जा मिळवला होता. टोकियो ऑलिम्पिकपूर्वी नीरज चोप्रा भालाफेकपटूंच्या क्रमवारीत १६ व्या क्रमांकावर होता. पण आता सुवर्ण पदकाची कमाई केल्यानंतर नीरजनं थेट दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे.