Neeraj Chopra : नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा' पुरस्कार, प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 25, 2022 05:28 PM2022-01-25T17:28:31+5:302022-01-25T17:29:02+5:30

टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचा प्रजासत्ताक दिनी मोठा सन्मान केला जाणार आहे.

Olympic Gold Medalist Neeraj Chopra to be Honoured with Param Vashistha Seva Medal on Republic Day Eve | Neeraj Chopra : नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा' पुरस्कार, प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान 

Neeraj Chopra : नीरज चोप्राला 'परम विशिष्ट सेवा' पुरस्कार, प्रजासत्ताक दिनी होणार सन्मान 

Next

Neeraj Chopra will be honoured with Param Vashistha Seva Medal - टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू नीरज चोप्रा (Neeraj Chopra) याचा प्रजासत्ताक दिनी मोठा सन्मान केला जाणार आहे. नीरज चोप्राला परम विशिष्ट सेवा पुरस्कारानं गौरविण्यात येणार आहे. नीरज हा भारतीय सैन्यात सुभेदार आहे आणि टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण जिंकल्यानंतर त्याला हा पुरस्कार दिला जात आहे. परम विशिष्ट सेवा पुरस्कार ( PVSM) हा भारताचा एक सैन्य पुरस्कार आहे. १९६०पासून हा पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. सेवा क्षेत्रात असाधारण कामगिरी करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो.

नीरज चोप्रानं टोक्योत भालाफेकीत ८७.५८ मीटर कामगिरीसह सुवर्णपदक जिंकले. ट्रॅक अँड फिल्डमध्ये भारताला पहिलं ऑलिम्पिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा पराक्रम नीरजनं केला. २००८नंतर ऑलिम्पिकमध्ये भारताला पहिलं वैयक्तिक सुवर्णपदक नीरजमुळे मिळाले. २००८मध्ये नेमबाज अभिनव बिंद्रानं वैयक्तिक सुवर्णपदक जिंकले होते. नीरज चोप्रा हा ४ राजपूताना रायफल्समध्ये सुभेदार या पदावर कार्यरत आहे. 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मंगळवारी ३८४ जवानांसाठी वीरता पुरस्काराची घोषणा केली. त्यात १२ शौर्य चक्र, २९ परम विशिष्ट सेवा पुरस्कार, ४ उत्तम युद्ध सेवा पुरस्कार, ५३ अती विशिष्ट सेवा पुरस्कार, १३ युद्ध सेवा पुरस्कार आदींचा समावेश आहे.   

Web Title: Olympic Gold Medalist Neeraj Chopra to be Honoured with Param Vashistha Seva Medal on Republic Day Eve

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.