बस कंडक्टरच्या मुलीने मिळवून दिलं ऑलिम्पिक पदक

By admin | Published: August 18, 2016 09:05 AM2016-08-18T09:05:09+5:302016-08-18T09:14:53+5:30

रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत 125 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याचं तिकीट देणा-या पैलवान साक्षी मलिकचे वडील दिल्लीत बस कंडक्टर आहेत

Olympic medal winner given by the conductor's daughter | बस कंडक्टरच्या मुलीने मिळवून दिलं ऑलिम्पिक पदक

बस कंडक्टरच्या मुलीने मिळवून दिलं ऑलिम्पिक पदक

Next
- ऑनलाइन लोकमत 
रिओ दी जानेरो, दि. 18 - रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक मिळवत 125 कोटी भारतीयांना आनंद साजरा करण्याचं तिकीट देणा-या पैलवान साक्षी मलिकचे वडील दिल्लीत बस कंडक्टर आहेत. ऑलिम्पिकमध्ये आजपर्यंत कोणत्याही महिला पैलवानाने पदक जिंकलेलं नाही. साक्षी मलिक पदक जिंकणारी पहिलीची भारतीय महिला पैलवान ठरली आहे. सोबतच साक्षी मलिकचं पदक भारताचं कुस्तीतलं पाचवं पदक ठरलं आहे. पण अनेकांना माहित नसेल की, साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी आहे.
 
(ऑलिम्पिक पदक जिंकणारी साक्षी मलिक पहिलीच भारतीय महिला पैलवान)
(साक्षी मलिकनं मिळवून दिलं भारताला पहिलं पदक)
 
साक्षी मलिक सर्वसाधारण कुटुंबातील मुलगी असून तिचे वडील सुखबीर मलिक दिल्ली ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशनमध्ये (डीटीसी) कंडक्टरची नोकरी करतात. तर साक्षीची आई सुदेश मलिक या रोहतक येथे अंगणवाडी सुपरवाझर आहेत. ऐकून आश्चर्य वाटेल पण कांस्यपदक जिंकणा-या साक्षीला तिच्या आईने पैलवानी करण्यापासून विरोध केला होता. साक्षीने पैलवान होऊ नये अशी तिच्या आईची इच्छा होती. पैलवानाची बुद्धीमत्ता कमी असते, तिथे बुद्धीचा वापर होत नाही अशी त्यांची समजूत असल्याने त्यांनी हा विरोध केला होता.  
 
 
साक्षीच्या कुटुंबात अखाड्याची परंपरा राहिलेली आहे. तिचे आजोबा पैलवान होते आणि ती त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून पैलवान झाली. आतात कांस्यपदक जिंकून तिने आपला निर्णय सार्थ ठरवला आहे. 
 
23 वर्षीय साक्षी मलिक दररोज 6 ते 7 तास प्रॅक्टिस करते. ऑलिम्पिकसाठी तिने एक वर्ष आधीपासूनच तयारी सुरु केली होती. रोहतक येथील साई (स्पोर्ट्स अॅथॉरिटी ऑफ इंडिया) होस्टेलमध्ये ती राहत होती. दिवसातील 6-7 तास प्रॅक्टिससाठी दिल्यानंतरही तिने अभ्यासावर परिणाम होऊ दिला नाही, आणि चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाली आहे. साक्षीने आतापर्यंत अनेक मेडल जिंकले आहेत, मात्र रिओ ऑलिम्पिकमध्ये मिळालेलया या पदकाने जगाला तिची ओळख करुन दिली आहे. 
 

महिला कुस्तीच्या ५८ किलो वजनी गटात झालेल्या लढतीत साक्षी मलिकनं किर्गिझस्तानच्या आयसूलू टिनिबेकोव्हावर ८-५ ने मात करत विजय मिळवला. साक्षी मलिक आणि आयसूलू टिनिबेकोव्हा यांच्यातील ही लढत चांगलीच रंगतदार ठरली. रेपेचेजमध्ये संधी मिळताच साक्षीने ५८ किलो गटात कांस्य पदकाच्या निर्णायक कुस्तीत पहिल्या तीन मिनिटांत ०-५ ने माघारल्यानंतरही अखेरच्या तीन मिनिटांत तब्बल आठ गुणांची कमाई करीत कांस्यपदकावर नाव कोरले. 
 
पराभूत आयसूलू टिनिबेकोव्हा हिने रेफ्रल मागितले पण रेफ्रलचा निर्णय देखील भारताच्या बाजूने जाताच साक्षीला आणखी एक गुण मिळाला. साक्षीने तिरंगा उंचावित प्रशिक्षकासह विजयाचा आनंद साजरा केला. पहिल्या पदकाचा आनंद भारतीय चाहत्यांनी देखील टाळ्यांच्या गजर करीत साक्षीच्या कर्तृत्वाला दाद दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही ट्विटरच्या माध्यमातून साक्षी मलिकचं अभिनंदन केलं. रक्षाबंधनाच्या या शुभदिवशी भारताची कन्या साक्षी मलिकने ब्राँझ पदक पटकावून सर्वांचा अभिमान वाढवला आहे अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.

Web Title: Olympic medal winner given by the conductor's daughter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.